आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराएंटरटेन्मेंट डेस्कः बॉलिवूड अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा आणि मनोज वाजपेयी यांची प्रमुख भूमिका असलेला 'अय्यारी' हा चित्रपट अखेर आज (16 फेब्रुवारी) रिलीज झाला आहे. हा चित्रपट जवानांच्या आयुष्यावर आधारित आहे. या चित्रपटात मनोज वाजपेयी, सिद्धार्थ मल्होत्रासोबतच अनुपम खेर, नसीरुद्दीन शाह आणि दाक्षिणात्य अभिनेत्री रकूल प्रीत सिंह प्रमुख भूमिकेत आहे.
राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त अभिनेता मनोज बाजपेयी एका सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातून असल्याचे फार कमी जणांना ठाऊक आहे. बिहारच्या गल्लीबोळातून बाहेर पडून तो बॉलिवूडचा यशस्वी अभिनेता ठरला आहे. एकेकाळी मनोजला केवळ 300 रुपयांत उदरनिर्वाह करावा लागत असे.
मनोज म्हणतो, "मी खूपच छोट्या गावावरुन आलो आहे. 80 च्या दशकात मी जेव्हा गावाच्या बाहेर आलो तेव्हा बसदेखील नव्हती. गावातून पाटण्याला गेलो आणि तेथून दिल्लीला. तेथे मी दहा वर्षे घालवली. तेव्हा तेथून मुंबईला आलो. हा खूप मोठा प्रवास होता. लाखो लोकांची भेट झाली. खूप मित्र मिळाले, मी हेच कमावले. याच लोकांच्या शुभेच्छा माझ्यासोबत आहेत."
मनोज त्या गावातील तरुण आहे, जिथे आजही अभिनय करणे चांगले समजेल जात नाही...
- मनोजचे घर बिहारमधील बेलवा गावांत आहे. या ठिकाणी आजही अभिनेता असणे चांगले समजले जात नाही.
- जेव्हा मनोजने आपल्या कुटुंबीयांकडे अभिनेता बनण्याची इच्छा व्यक्त केली तेव्हा, कुटुंबीयच नव्हे तर शेजारी, नातेवाईकांनी त्याची खिल्ली उडवली होती.
- मनोजचे चौथीपर्यंतचे शिक्षण गावात झाले. त्यानंतर बिहारच्या बेतिया या ठिकाणी त्याला पुढील शिक्षणासाठी पाठवण्यात आले.
- येथील केआर हायस्कूलमध्ये त्याने दहावीपर्यंतचे शिक्षण घेतले.
- बेतिया येथील महाराणी जानकी कॉलेजमधून त्याने बारावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले.
- पुढील शिक्षणासाठी मनोज वयाच्या 17 व्या वर्षी दिल्लीत आला. दिल्ली युनिव्हर्सिटीच्या सत्यवती आणि रामजस कॉलेजमधून त्याने पदवीपर्यंतचे शिक्षण घेतले.
पुढे वाचा - अभिनयातच करिअर करण्याचा घेतला निर्णय...
- का केला होता आत्महत्येचा विचार? यांसह बरेच काही...
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.