आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामुंबई: बॉलिवूड अभिनेता अजय देवगणचा 'रेड' हा चित्रपट आज (16 मार्च) रिलीज झाला आहे. या चित्रपटात अजयने निडर इनकम टॅक्स ऑफिसवर अमय पटनायकची भूमिका वठवली आहे. हा चित्रपट 1981 मध्ये यूपीच्या लखनऊ शहरात घडलेल्या एका सत्य घटनेवर आधारित आहे. 2 एप्रिल 1969 रोजी नवी दिल्लीमध्ये जन्मलेल्या अजय देवगणचे खरे नाव विशाल वीरु देवगण आहे. प्रेमाने त्याला राजू म्हणून बोलावले जाते. पद्मश्री पुरस्काराने सन्मानित अजय देवगण गेल्या 25 वर्षांपासून फिल्म इंडस्ट्रीत अॅक्टिव्ह आहे.
इंट्रेस्टिंग आहे अजय आणि काजोलची लव्ह स्टोरी...
अभिनेता अजय देवगणचे लग्न ज्येष्ठ अभिनेत्री तनुजा यांची थोरली लेक काजोलसोबत झाले आहे. या दोघांच्या लग्नाला 18 वर्षांचा काळ लोटला असून या दोघांना न्यासा ही मुलगी आणि युग हा एक मुलगा आहे. या दोघांचे नाते फिल्मी सेटपासून ते लग्नाच्या मंडपापर्यंत कसे पोहोचले, यामागेच रंजक कहाणी आहे. काजोलने आपल्या प्रेमकहाणीविषयी एका मुलाखतीत सांगितले होते. अजयसोबतचे तिचे लव्ह अॅट फस्ट साइट म्हणजे पहिल्या नजरेतील प्रेम नव्हते.
या कारणामुळे काजोलने केले होते अजयसोबत लग्न...
24 फेब्रुवारी 1999 रोजी हे दोघे लग्न बंधनात अडकले होते. 90च्या दशकात करिअर यशोशिखरावर असताना काजोलने अजय देवगणसोबत लग्न करुन चाहत्यांना धक्का दिला होता. वयाच्या 25 व्या वर्षी काजोलने अजयसोबत लग्न केले. काजोलने असे का केले? याचे उत्तर तिने लग्नाच्या 17 वर्षांनंतर एका इंटरव्यूमध्ये दिले होते.
पुढे वाचा, का केले होते काजोलने वयाच्या 25 व्या वर्षी अजय देवगणसोबत लग्न आणि कशी सुरु झाली होती दोघांची लव्ह स्टोरी...
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.