आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअभिनेता अजय देवगणचा 'रेड' हा चित्रपट शुक्रवारी बॉक्स ऑफिसवर दाखल झाला आहे. या चित्रपटात अजयने निडर इनकम टॅक्स ऑफिसरची भूमिका वठवली आहे. सत्य घटनेवर या चित्रपटाचे कथानक आधारित आहे. ख-या आयुष्याविषयी बोलायचे झाल्यास, बॉलिवूडमध्ये असे अनेक सेलिब्रिटी आहेत, ज्यांच्या घरावर आयकर विभागाचे छापे पडले आहेत. स्वतः अजय देवगणच्या घरावरही रेड पडली होती.
अजयने स्वतः केला होता खुलासा..
एका मुलाखतीत अभिनेता अजय देवगणने सांगितले होते, की एकदा माझ्या घरावर रेड पडली होती. ते 90 चे दशक होते. मी त्यावेळी कामानिमित्त शहराबाहेर होतो. माझ्या एका चित्रपटाचे चित्रीकरण सुरु होते. छाप्याची कारवाई दोन दिवस चालली होती. पण अधिका-यांना माझ्या घरातून काहीही मिळाले नव्हते.
अभिनेत्री माधुरी दीक्षित...
माधुरी दिक्षितच्या घरावर आयकर विभागाचा छापा पडला आहे. रिपोर्टनुसार माधुरी दिक्षित जवळील ब्लॅक मनी शोधण्यासाठी तिच्या घरातील भिंती आणि फर्निचरही तोडून पाहण्यात आले होते. त्यावेळी बातम्या आल्या होत्या की, तिने तिची मॅनेजर साराजवळ सर्व पैसा लपवला होता.
पुढील स्लाइडवर क्लिक करुन जाणुन घ्या अशाच इतर सेलेब्सविषयी, ज्यांच्या घरावर पडले आहेत आयकर विभागाचे छापे...
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.