Home | Gossip | Alia Bhatt Auctioning Her Cloth For Helped In Lighting Up Homes Of 40 Families In Karnataka

गरीबांना वीज पोहोचवण्यासाठी आवडत्या ड्रेसला लिलाव करतेय आलिया भट्ट, 40 घरे उजळवली

दिव्य मराठी वेब टीम | Update - Jul 14, 2018, 03:55 PM IST

एकूण 200 घरांत वीज पोहोचवण्याचा तिचा मानस आहे. या कामासाठी AROHA नावाची सामाजिक संस्था आलियाची मदत करत आहे.

 • Alia Bhatt Auctioning Her Cloth For Helped In Lighting Up Homes Of 40 Families In Karnataka

  मुंबई - आलिया भट्ट सध्या तिच्या आवडीच्या ड्रेसेसचा लिलाव करून गरीबांच्या घरांमध्ये वीज पोहोचवण्याचे काम करत आहे. आलियाने तिच्या वॉर्डरोबमधील काही आवडत्या कपड्यांचा लिलाव करण्याचा निर्णय घेतला आहे. लिलावातून मिळालेल्या पैशाद्वारे गरीबांना वीज पोहोचवली जात आहे. आतापर्यंत या पैशातून 40 घरांमध्ये वीज पोहोचवण्यात आली आहे. एकूण 200 घरांत वीज पोहोचवण्याचा तिचा मानस आहे. या कामासाठी AROHA नावाची सामाजिक संस्था आलियाची मदत करत आहे.


  200 कुटुंबांना पोहोचवणार वीज
  - आलियाने लिलाव केलेले कपडे आणि इतर सामानातून जो पैसा मिळाला आहे, त्यातून नुकतेच कर्नाटकच्या मंड्या जिल्ह्यातील किकेरी गावातील 40 कुंटुंबांना वीज पोहोचवण्यात आली आहे.
  - या कामामध्ये आलियाला बेंगळुरूची सामाजिक संस्था आरोहा (AROHA) ने मदत केली आहे. AROHA ने Liter Of Light या नावाने का उपक्रम चालवला आहे.
  - आलिया या बाबत म्ङणाली, भारतात आजही अनेक कुटुंबे अंधारात राहतात. Liter Of Light द्वारे इकोफ्रेंडली सोलर लॅम्प्स अशा घरांमध्ये वीज पोहोचवण्याचा सर्वात चांगला मार्ग आहे असे आलिया म्हणाली.
  - या प्रोजेक्टद्वारे किकेरी गावाच्या जवळ 200 कुटुंबांना वीज उपलब्ध करून देण्याचा विचार आहे.

  अपकमिंग प्रोजेक्ट
  - चित्रपटाबाबत बोलायचे झाल्यास आलियाने नुकतीच वरुण धवनबरोबर 'कलंक' चित्रपटाची शुटिंग पूर्ण केली आहे. आता सध्या ती 'ब्रह्मास्त्र'मध्ये व्यस्त आहे.
  - 'ब्रह्मास्त्र'मध्ये आलियाबरोबरच रणबीर आणि अमिताभही झळकतील.

Trending