आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

100 कोटींच्या क्लबमध्ये गेला आलियाचा 'राजी', हे आहेत तिच्या आयुष्यातील Facts

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एन्टटेन्मेंट डेस्क : आलिया भट सध्या चर्चेत आहे. तिच्या 'राजी' चित्रपटाने 100 कोटींचा आकडा क्रॉस केला आहे. मेघना गुलजारच्या डायरेक्शनमध्ये तयार झालेल्या या चित्रपटात आलियासोबत विक्की कौशल प्रमुख भूमिकेत आहे. धर्मा प्रोडक्शन आणि जंगली पिक्चर्सच्या बॅनरखाली हा चित्रपट तयार झाला आहे. चित्रपटात आलिया गुप्तहेराच्या भूमिकेत   आहे. ती भारताची गुप्तहेर बनून पाकिस्तानात जाते. 'राजी' काश्मीरी मुलीच्या ख-या आयुष्यावर आधारीत चित्रपट आहे. जी 1971 मध्ये भारत-पाक युध्दा दरम्यान एका पाकिस्तानी सेना अधिका-यासोबत लग्न करुन घेते. चित्रपटाची शूटिंग काश्मीर, पंजाब आणि मुंबईमध्ये झाली आहे. चित्रपटात आलियाने दमदार अभिनय केला आहे. आज आम्ही या पॅकेजमध्ये तुम्हाला आलियाच्या आयुष्यातील काही फॅक्ट्स सांगणार आहोत. 

 

- आलिया भटचा जन्म मुंबईमध्ये झाला. तिच्या वडिलांचे नाव महेश भट्ट आणि आईचे नाव सोनी राजदान आहे. तिचे कुटूंब दिर्घकाळापासून फिल्म इंडस्ट्रीमध्ये काम करत आहेत. आलियाच्या बहिणीचे नाव पूजा भट्ट आहे. ती एक प्रसिध्द अभिनेत्री आहे.


- 15 मार्च 1993 रोजी मुंबईत तिचा जन्म झाला. आलियाने बाल कलाकार म्हणून 'संघर्ष' चित्रपटातून अभिनयात पदार्पण केले. यामध्ये तिने प्रिती झिंटाच्या बालपणीची भूमिका साकारली होती.


- अभिनेत्री म्हणून तिच्या करिअरची सुरुवात 'स्टूडेंट ऑफ द ईयर' मधून झाली होती. तिने आतापर्यंत हम्प्टी शर्मा की दुल्हनिया, उडता पंजाब सारखे हिट चित्रपट दिले.

 

आलिया भटचा आवडता रंग
आलिया भटला व्हाइट आवडते. ती म्हणते की, माझ्या स्किन टोनमुळे जास्त रंग यूज करु शकत नाही. परंतू हे मला खुप आवडते.

 

या रॅबिट साँगवर एक्सरसाइज करते आलिया
आलिया भट रॅबिट साँग  I'm onto you, yeah you I'm not your number one या गाण्यावर एक्सरसाइज करते. याच्या आर्टिस्टचे नाव  Anne Marie आहे तर अलबमचे नाव Speak Your Mind आहे. हे एक ब्रिटिश साँग आहे. 

 

60 व्या फिल्म फेअर अवॉर्डमध्ये आलिया
हा आलियाचा पहिला अवॉर्ड होता. 2014-15 मध्ये 'हायवे' चित्रपटासाठी 'बेस्ट अॅक्ट्रेस क्रिटिक' साठी तिला हा अवॉर्ड देण्यात आला. यावेळी ती भावूक झाली होती. तिला पाहून डायरेक्टर करण जोहरच्या डोळ्यातही अश्रू आले होते. ती म्हणाली होती की, अॅक्टिंगसाठी माझा जन्म झाला आहे आणि मी अॅक्टिंगच करणार.
 

 

बातम्या आणखी आहेत...