आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • आलिया भट, रणवीर सिंह, Alia Bhatt Ranveer Singh Movie Gully Boy Wrap Up Party

मीडिया प्रश्न विचारत असताना दुसरीकडे रणवीरची गळाभेट घेण्यात बिझी होती आलिया

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबईः आलिया भट आणि रणबीर कपूर आगामी 'गली बॉय' या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. अलीकडेच या चित्रपटाचे चित्रीकरण पूर्ण झाले. यानिमित्ताने सोमवारी इस्को बार येथे रॅपअप पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. पार्टीत अनेक सेलेब्स पोहोचले होते. चित्रपटात लीड रोल साकारणारे आलिया भट आणि रणवीर सिंह हे देखील यावेळी हजर होते. पार्टी झाल्यानंतर जेव्हा मीडियाचे रिपोर्टर आलियाला प्रश्न विचारण्याचा प्रयत्न करु लागले, तेव्हा ती रणवीरची गळाभेट घेण्यात बिझी दिसली. या पार्टीत आळिया सिल्व्हर कलरच्या शॉर्ट ड्रेसमध्ये स्पॉट झाली. तर रणवीर सिंह यलो कलरच्या टी-शर्ट आणि फ्लोरल प्रिंट पँटमध्ये दिसला. चित्रपटाची दिग्दर्शिका झोया अख्तरदेखील यावेळी पार्टीत दिसली. कल्की कोचलिन, क्रूबा सेटसह चित्रपटातील इतर कलाकरांनीही ही पार्टी एन्जॉय केली. 


2019 मध्ये रिलीज होणार चित्रपट...
- दिग्दर्शिका झोया अख्तरचा 'गली बॉय' हा चित्रपट 14 फेब्रुवारी 2019 रोजी रिलीज होणार आहे.
- शंकर-एहसान-लॉय या चित्रपटाचे संगीतकार तर झोया अख्तर, फरहान अख्तर, रितेश सिधवानी निर्माते आहेत.
- चित्रपटात आलिया-रणवीरशिवाय कल्की कोचलिन, पूजा गौर, अली असगर, सुदेश लहरी, नरस, विजय वर्मा, प्रकाश राज यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत.


पुढील स्लाईड्सवर बघा, रॅपअप पार्टीचे फोटोज... 

बातम्या आणखी आहेत...