आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नव-यापासून 25 वर्षांपासून वेगळी राहत आहे ही बॉलिवूड सिंगर, अशी आहे Love Story

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अनेक सुपहिट चित्रपटांसाठी पार्श्वगायन करणारी गायिका अलका याज्ञिकचा आज वाढदिवस असून तिने वयाची 52 वर्षे पूर्ण केली आहेत. 20 मार्च, 1966 रोजी कोलकाता येथे तिचा जन्म झाला. अलका गेल्या 25 वर्षांपासून पती नीरज कपूरपासून वेगळी राहात आहे. पण वेगळे राहूनदेखील त्यांचे नाते आणि प्रेम टिकून आहे. दोघांची एक मुलगी असून सायशा तिचे नाव आहे. सायशा अलकासोबत राहते. आज आम्ही तुम्हाला या पॅकेजमधून अलका आणि नीरज यांच्या लव्हस्टोरीविषयी सांगत आहोत.

 

1989 मध्ये केले होते अलका-नीरज यांनी लग्न...
अलका याज्ञिक आणि शिलाँग बेस्ड बिझनेसमन नीरज कपूर यांच्यासोबत 1989 मध्ये लग्न केले होते. लग्नानंतर कामाच्या निमित्ताने अलका सर्वाधिक काळ मुंबईत वास्तव्याला असायची. तर नीरज हे त्यांच्या बिझनेसमुळे शिलाँगमध्ये राहायचे. अलका याज्ञिक कामातून जसा वेळ मिळेल तशी शिलाँग जात असे, तर कधी कधी नीरज मुंबईत येत असतं. दीर्घकाळ असाच क्रम सुरु होता. याचकाळात त्यांच्या घरी मुलीचा जन्म झाला. सायशा आता 27 वर्षांची आहे. अखेर दोघांनी आपापल्या कामावरच लक्ष केंद्रित करण्याचा निर्णय घेतला.


पुढील स्लाईड्सवर वाचा, कशी झाली होती, अलका आणि नीरज यांची भेट...

बातम्या आणखी आहेत...