आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

B'day:अमिषाच्या वागण्याला वैतागले होते कुटुंबीय, आईने चप्पलांनी मारुन हाकलले घराबाहेर

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड अभिनेत्री अमीषा पटेलचा जन्म 9 जून 1976 रोजी मुंबईत झाला. गुजराती कुटुंबातील असलेल्या अमीषाने 2000 साली कहो ना प्यार है या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये डेब्यू केला होता. अमिषाचा पहिलाच चित्रपट सुपरडुपर हिट ठरला. या चित्रपटाच्या हिट झाल्यानंतर 2001 साली 'गदर' या चित्रपटही सुपरहिट ठरला होता. 

 

चित्रपटात येण्याअगोदर अमीषा पटेल आणि नेस वाडीया यांच्यात अफेअर असल्याच्या चर्चा होत्या. दोघेही एकाच कॉलेजमध्ये शिक्षण घेत होते आणि त्यावेळी त्यांच्यात प्रेम फुलले. नेस वाडीयाला अमिषासोबत लग्न करायचे होते तर अमिषाला चित्रपटांत करिअर करायचे होते. यामुळे दोघांमध्ये ब्रेकअप झाले. त्यानंतर नेस वाडीयाचे अफेअर अनेक वर्षे प्रिटी झिंटासोबतही होते. 

नेस वाडीयापासून वेगळी झाल्यानंतर अमिषाचे नाव डायरेक्टर-प्रोड्यूसर विक्रम भट्टसोबत जोडले गेले. अमिषाचे घरच्यांचा या नात्याला विरोध होता.  अमिषाने दिलेल्या एका वक्तव्यात म्हटले होते की, तिच्या आईने तिला चप्पलांनी मारले होते आणि घरातून बाहेर काढले होते. 
 
अमिषा आणि विक्रम भट्ट यांचे नातेही फार काळ टिकले नाही आणि 2008 साली त्यांचे ब्रेकअप झाले. याशिवाय अमिषाने तिच्या वडिलांवरच 12 कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप केला होता. तिचे म्हणणे होते की तिच्या आईवडिलांनी तिच्या पैशांचा गैरवापर केला. 

 

अमिषा सध्या मोठमोठ्या पार्ट्यांमध्ये दिसते आणि नेहमीच दारुच्या नशेत बाहेर येतांना दिसते. काही महिन्यांपूर्वी अमिषाचे टीव्ही अभिनेता कुशाल टंडनसोबतही झालेले भांडण चर्चेत आले होते. 
 
पुढच्या स्लाईडवर पाहा, अमिषा पटेलचे काही खास फोटोज्...

बातम्या आणखी आहेत...