आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Economics गोल्ड मेडलिस्ट आहे अमिषा तर विद्याने घेतले सोशियोलॉजीचे शिक्षण, भेटा Highly Educated सेलिब्रिटींना

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबईः 'कहो ना प्यार है' या एका सुपरहिट चित्रपटाने रातोरात प्रसिद्धीस आलेली अभिनेत्री अमिषा पटेल आज तिचा ४२वा वाढदिवस साजरा करत आहे. 9 जून 1976 साली मुंबईत जन्मलेल्या अमिषाने कहो ना प्यार है, गदर यांसारख्या सुपरहिट चित्रपटातून चांगलीच लोकप्रियता मिळविली. आता जरी अमिषाच्या हातात फारसे काही चित्रपट नसले तरी अनेक पार्ट्यांमधून अमिषा हजेरी लावत असते. फार कमी जणांना माहीत आहे की अभिनयातही वरचढ ठरलेली अमिषाने तिचे शिक्षण पूर्ण केले आहे. शालेय जीवनात असल्यापासूनच अमिषा अभ्यासात खूप हुशार होती. मुंबईतील कॅथेड्रल आणि जॉन कॅनन स्कूलमधून तिने शालेय शिक्षण पूर्ण केले. शालेय जीवनात ती क्लास मॉनिटरसुद्धा होती. अमेरिकेतील मॅसाच्युसेट्समधील टफ्ट्स युनिव्हर्सिटी, मेडफोर्ड येथून तिने अर्थशास्त्रात पदवी प्राप्त केली. त्यानंतर बोस्टन युनिव्हर्सिटीतून बायोजेनेटिक इंजिनिअरिंगमध्ये पदवी मिळवली. ग्रॅज्युएशनंतर तिला मॉर्गन स्टेनली कंपनीकडून जॉब ऑफर झाला होता. मात्र तिने तो न स्वीकारता बॉलिवूडकडे आपला मोर्चा वळवला. 

 

विद्या बालनः सोशियोलॉजी विषयात घेतली पदवी
विद्याने महाविद्यालयीन जीवनात असतानाच टीव्ही इंडस्ट्रीत पदार्पण केले होते. मात्र करिअरसाठी तिने शिक्षणाकडे मुळीच दुर्लक्ष केले नाही. मुंबईतील सेंट अॅन्थोनी गर्ल्स हायस्कूलमधून तिने शालेय शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर सेंट झेवियर कॉलेजमधून सोशियोलॉजी या विषयात पदवी प्राप्त केली. 
 
केवळ अमिषाच नव्हे तर असे अनेक बॉलिवूड सेलिब्रेटी आहेत ज्यांनी अभिनय क्षेत्रात येण्यासाठी शिक्षण अर्धवट सोडले नाही तर शिक्षण पूर्ण करुन आज बॉलिवूडमध्ये नाव कमवत आहेत.

 

पुढच्या स्लाईडवर पाहा, अशाच काही बॉलिवूड सेलिब्रेटींविषयी...

बातम्या आणखी आहेत...