आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शाहरुखमुळे ट्विटरला \'अलविदा\' करणार अमिताभ? दिली अशी धमकी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूडचे 'शहंशाह' अमिताभ बच्चन यांनी ट्विटरला रामराम ठोकण्याचे संकेत दिले आहेत. रात्री उशीरा ट्विट करुन त्यांनी आपल्या फॉलोवर्सला ही माहिती दिली. त्यांच्या फॉलोवर्सची संध्या 3.3 वरुन अचानक कमी होऊन 3.29 कोटी झाल्यामुळे महानायक अमिताभ बच्चन यांनी ही घोषणा केली आहे. परंतू ही घोषणा त्यांनी विनोदात केली आहे की, गांभीर्याने केली आहे हे अजून स्पष्ट झालेले नाही.

 

- अमिताभ यांनी ट्वीट करुन सांगितले की, "ट्विटरने माझे फॉलोअर्स कमी केले आहेत का? की हा विनोद आहे? आता तुम्हाला रामराम ठोकण्याची वेळ आली आहे. आतापर्यंतच्या प्रवासासाठी सर्वांचा आभारी आहे. या समुद्रात बरेच मासे आहेत आणि यामधील काही अतिशय रंजक आहेत."

 

- ट्विटर फॉलोअर्सच्या टॉप सेलिब्रिटीजविषयी बोलायचे झाले तर, पंतप्रधान मोदींनंतर अमिताभ बच्चन यांना देशातील सर्वाधिक ट्विटर यूजर्स फॉलो केलं जातं. पण बुधवारच्या आकडेवारीनंतर अमिताभ बच्चन यांच्या ऐवजी शाहरुख खानने दुसऱ्या क्रमांकावर झेप घेतली आहे. तर अमिताभ बच्चन यांची तिसऱ्या क्रमांकावर घसरण झाली आहे.

 

- सध्या शाहरुख खानचे 3 कोटी 29 लाख 35 हजार 562 ट्विटर फॉलोअर्स आहेत. तर अमिताभ बच्चन यांचे 3 कोटी 28 लाख 99 हजार 787 फॉलोअर्स आहेत.

 

- बिग बी हे ट्विटर फॉलोअर्सच्या बाबतीत समलान खान (3.07 कोटी), आमिर खान (2.28 कोटी), प्रियांका चोप्रा(2.16 कोटी) आणि दीपिका पदुकोण(2.3 कोटी) पेक्षा आघाडीवर आहेत.

 

पुढील स्लाइडवर क्लिक करुन जाणुन घ्या अमिताभ बच्चन यांचे ट्विट...

 

(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

 

 

 

बातम्या आणखी आहेत...