आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Big B With Daughter Shweta Nanda Auto Ride: Amitabh Bachchan Write Blog On Auto Rickshaw Driver

मुलीसोबत ऑटोमध्ये बसले अमिताभ, रिक्षा चालकाच्या कमाईवर लिहिला Blog

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : अमिताभ बच्चन मंगळवारी मुलगी श्वेतासोबत ऑटो स्वारी करताना दिसले. दोघंही पहिल्यांदाच एकत्र एका जाहिरातीचे शूट करत आहेत. याच कारणांमुळे ते ऑटोमध्ये बसले. शूटिंग दरम्यान ऑटो राइड करणा-यावर अमिताभ एवढे प्रभावित झाली की, त्यांनी त्याच्यावर एक ब्लॉग लिहिला. 


रिक्षा चालकाच्या इनकमवर लिहिला ब्लॉग
- अमिताभ यांनी ब्लॉगमध्ये लिहिले, "आज मी प्रवासाचे आवडते माध्यम ऑटोमधून कामावर गेलो. तुम्ही याला ऑटो रिक्षा, ऑटो काहीही म्हणून शकता."
- "प्रत्येक वेळी चेह-यावर स्माइल ठेवणारा ऑटो चालक शरीकला मी विचारले की, तो दिवसाचे किती कमावतो तेव्हा त्याने सांगितले की, 1,500 ते 1,800 आणि जेव्हा शूटसाठी रिक्षा जातो तेव्हा 5,000 किंवा यापेक्षा जास्त मिळतात. "
- हे जाणून घेतल्यानंतर अमिताभ यांना अस्वस्थ वाटत होते. त्यांनी लिहिले की, "मी या देशाची प्रशंसा करतो. मी या जगाची प्रशंसा करतो. परंतू मी स्वतःला असहाय वाटते. मी खुप नशीबवान आहे की, मला असा जन्म मिळाला."

 

वयाच्या 44 व्या वर्षी डेब्यू करतेय श्वेता 
- अमिताभ यांची मुलगी 44 वर्षांची आहे. श्वेता नंदा लवकरच अॅक्टिंग डेब्यू करणार आहे. ती एखाद्या चित्रपटात नाही तर जाहिरातीत झळकणार आहे.


जाहिरातीत सिंपल लूकमध्ये दिसतेय श्वेता
- जाहिरातीत श्वेता बच्चन नंदा सिंपल लूकमध्ये दिसतेय.
- तिने ऑफ व्हाइट आणि येलो कलरचा कुर्ता घातला आहे. अमिताभ चेक शर्ट, ब्लॅक पँट आणि काळ्या मफलरमध्ये दिसत आहेत.
- जाहिरातीच्या शूटिंगचे जे फोटोज समोर आलेय यामध्ये अमिताभ-श्वेता मध्यम वर्गीय कुटूंबातील भूमिका साकारत आहेत.
- अमिताभ एका वयस्कर व्यक्तीच्या भूमिकेत आहेत. तर श्वेता त्यांना आधार देताना दिसतेय. 
- वृत्तांनुसार या जाहिरातीतून वडील आणि मुलीमधील नाते दाखवण्यात येणार आहे. ही जाहिरात हिंदीसोबतच मल्याळम भाषेतही बनवण्यात येणार असे बोलले जातेय.

 

पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा अमिताभ बच्चन यांचे ऑटोमधील फोटोज...

 

(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...