आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामुंबई: 60 वर्षांची झालेल्या अमृता सिंहने करिअरची सुरुवात 'बेताब' (1983) सिनेमातून केली होती. सिनेमाच्या शूटिंगदरम्यान तिचे अफेअर को-स्टार सनी देओलसोबत सुरु झाले होते. मात्र त्यावेळी सनीचे पूजासोबत लग्न झालेले होते. परंतु त्याने हे अमृतापासून लपून ठेवलेले होते.
कुटुंबीयांच्या दबावामुळे सनीने केले होते लग्न...
सनीचे पहिले लग्न बिझनेस अॅग्रीमेंट अंतर्गत झाले होते. धर्मेंद्र यांची इच्छा नव्हती, की 'बेताब' रिलीज होण्यापूर्वी सनीच्या लग्नाची बातमी उघड व्हावी. कारण त्यामुळे सनीच्या रोमँटिक इमेजवर निगेटीव्ह परिणाम पडला असता. सिनेमा रिलीजपर्यंत पूजा लंडनमध्ये होती. त्यावेळी सनी पूजाला भेटण्यासाठी गुपचुप लंडनला जात होता. त्यानंतर जेव्हा वर्तमानपत्रांमध्ये सनीच्या लग्नाच्या बातम्या छापल्या त्यावेळीसुध्दा सनीने बातम्यांचे खंडन केले होते.
कुटुंबियांनासुध्दा खटकत होते...
अमृताची आई रुखसाना सुल्ताना आधीपासूनच या नात्याच्या विरोधात होते. सनीची आई प्रकाश कौर यांनासुध्दा हे नाते खटकत होते. कारण त्यांना सनीच्या लग्नाची माहिती होती.
अमृताने तोडले होते नाते...
सनीचे सत्य समोर आल्यानंतर अमृताने त्याच्यासोबतचे नाते तोडले आणि आयुष्यात पुढे जाण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर तिचे नाव रवी शास्त्रीसोबत जुळले. परंतु हे नाते दिर्घकाळ टिकू शकले नाही. या नात्यानंतर अमृताच्या आयुष्यात सैफ अली खान आला. सैफ आणि अमृताचे 1991मध्ये लग्न झाले होते.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा सनी देओल आणि अमृता सिंह यांचे निवडक फोटो...
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.