आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कधी-कधी बायकोला माधुरी अशी हाक मारायचे अनिल कपूर, स्वतः केला खुलासा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : सलमान खानचा आगामी चित्रपट 'रेस 3' मध्ये अभिनेता अनिल कपूर प्रमुख भूमिका साकारणार आहेत. अनिल कपूर नुकतेच 'दस का दम' या शोमध्ये 'रेस 3' चे प्रमोशन करण्यासाठी गेले होते. येथे त्यांनी खुलासा केला की, ते कधी-कधी आपल्या बायकोला माधुरी म्हणून हाक मारायचे.


सलमानच्या प्रश्नावर अनिल कपूरने दिले होते उत्तर
- अनिल कपूर, सलमान खानचा गेम शो '10 का दिम' मध्ये पोहोचले होते. अनिलसोबत या शोमध्ये 'रेस 3' ची पुर्ण स्टारकास्ट पोहोचली होती.
- शोमध्ये सलमानने प्रश्न विचारला की, कीती टक्के भारतीय आपल्या पार्टनरला दूस-या नावाने हाक मारतात?
- या प्रश्नावर उत्तर देत अनिलने खुलासा केला की, ते कधी-कधी आपल्या पत्नीला माधुरीच्या नावाने हाक मारायचे.
- अनिलचे हे उत्तर ऐकून सर्व लोक खुप हसले.
- अनिल म्हणाले की, त्यांनी अनेक चित्रपटात माधुरीसोबत काम केले आहे.
- अनिल कपूर यांनी यावेळी बायकोची स्तुती केली. ते म्हणाले की, सुनीता यामुळे कधीच नाराज झाली नाही, तिला माझे प्रोफेशन समजते. सुनीता यांनी सुनिल यांना नेहमीच सपोर्ट केला.
- माधुरी आणि अनिल 90 च्या दशकातील हिट जोडी आहे. दोघांनी अनेक सुपरहिट चित्रपट चित्रपट दिले. दोघांनी 'तेजाब', 'बेटा', 'राम लखन', 'किशन कन्हैया', 'पुकार', 'हिफाजत', 'परिंदा', 'खेल', 'जमाई राजा', 'राजकुमा'र, 'प्रतिकार' सोबतच अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केले. 
- सलमान खानचा मल्टीस्टारर चित्रपट 'रेस 3' ईदच्या निमित्ताने रिलीज होतोय. या चित्रपटात सलमानसोबत अनिल कपूर, बॉबी देओल, डेजी शाह, शाकिब सलीम, जॅकलीन फर्नांडिज, फ्रेडी जारुवाला प्रमुख भूमिकेत आहेत.

बातम्या आणखी आहेत...