आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

श्रीदेवीच्या सौंदर्यामुळे जेव्हा अनिल कपूरचे करिअर आले होते धोक्यात, बनले होते शत्रू

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

श्रीदेवी आणि अनिल कपूर 80च्या दशकात 'मिस्टर इंडिया' तसेच 'लम्हे' यांसारख्या चित्रपटांनी बेसेट जोडी बनले होते. दोघांची जोडी प्रेक्षकांना फारच आवडत असे. पण एक वेळ अशी आली होती ती अनिल कपूर श्रीदेवीचा तिरस्कार करु लागले होते आणि याचमुळे त्यांनी  एक खूप मोठी चुकही केली. 

 

ती वेळ अशी होती की जेव्हाल दोघे कोणत्याही चित्रपटात काम करत असत तर त्याचे सर्व स्टारडम श्रीदेवीला मिळत असे. दोघेही त्यांच्या करिअरच्या पीकवर होते. त्यानंतर एक वेळ अशी आली होती की श्रीदेवीच्या स्टारडमचा अनिल कपूर यांना तिरस्कार वाटू लागला होता. 

सीनियर जर्नलिस्ट सुभाष के झा यांनी एका मुलाखतीत सांगितले की, श्रीदेवी अनिल कपूर यांच्याहून मोठी स्टार बनली होती जे अनिल कपूर यांना आवडत नव्हते. याचमुळे अनिल कपूर यांनी दोन ब्लॉकबस्टर चित्रपट रिजेक्ट केले. हीच अनिल कपूर यांची मोठी चूक होती.  


ते दोन चित्रपट होते, 'चालबाज' आणि चांदनी. जेव्हा अनिल कपूर यांना वाटले की श्रीदेवीच्या भूमिकेच्या तुलनेत  त्यांची भूमिका इतकी दमदार नाही तेव्हा त्यांनी हे चित्रपट करण्यास नकार दिला. बोनी कपूर यांनी दोघांना घेऊन 'रूप की रानी चोरों का राजा' बनविली. त्यावेळी तो सर्वात बिग बजेट बॉलिवूड चित्रपट ठरला होता. पण हा चित्रपट सुपरफ्लॉप ठरला आणि श्रीदेवी-अनिल यांच्यातील लढाईही संपली.

 

श्रीदेवी यांच्या निधनानंतर अनिल कपूर बोनी यांच्यासोबत मजबुतीने उभे राहिले होते. जान्हवी आणि खुशी श्रीदेवी यांच्या निधनानंतर त्यांच्या घरी काही दिवस राहण्यासाठी गेले होते. 

 

पुढच्या स्लाईडवर पाहा, अनिल कपूर-श्रीदेवी यांचे काही फोटोज्..

बातम्या आणखी आहेत...