आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तुम्हाला माहित आहे का, अनुष्का-साक्षीची केव्हा पासून आहे मैत्री

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अनुष्का-विराटच्या लग्नाचे दुसरे रिसेप्शन मंगळवारी (26 डिसेंबर) मुंबईत झाले. यावेळी बॉलिवूडसोबतच अनेक क्रिकेटर आपापल्या पत्नीसोबत कपलला शुभेच्छा देण्यासाठी आले होते. यावेळी टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी पत्नी साक्षी आणि मुलगी जीवासोबत आला होता. तुम्हाला वाचून आश्चर्य होईल की अनुष्का आणि साक्षी यांची मैत्री काही त्यांच्या हसबंडमुळे झालेली नाही, तर या दोघी बालपणीच्या मैत्रिणी आहेत. अनुष्का आणि साक्षीचे शिक्षण एकाच शाळेत झाले होते. 

 

अनुष्का फॅन क्लबने शेअर केला फोटो... 
- अनुष्का आणि साक्षी या मैत्रीचा खुलासा नुकताच झाला आहे. अनुष्का फॅन क्लबने या दोघींच्या बालपणीचा एक फोटो ट्विट केल्यानंतर हा मैत्रीचा उलगडा झाला आहे. 
- अनुष्का आणि साक्षीचा शाळेतील कार्यक्रमाचा एक फोटो ट्विट करण्यात आला आहे. त्यानंतर अनुष्काने स्वतः खुलासा केला की साक्षी तिची बालपणीची मैत्रिण आहे.
- 2010 मध्ये धोनी आणि साक्षीचे लग्न झाले होते. त्यावेळी साक्षी आणि अनुष्काची भेट झाली होती. साक्षीने सांगितले होते की तिचे शिक्षण आसाममध्ये झाले होते. 
-  त्यावेळी अनुष्कानेही साक्षीला सांगितले की तिचेही शिक्षण आसाममध्ये झाले. दोघींनी जेव्हा बालपणीचा एक फोटो पाहिला तेव्हा त्या बालपणीच्या आठवणीत रमून गेल्या होत्या. 
- आसाममधील मार्घेरिटा येथील सेंट मेरी स्कूलमध्ये त्यांचे शिक्षण झाले होते.  
- यानंतर एका मुलाखतीत अनुष्काने हे मान्य केले होते की दोघींचे शालेय शिक्षण आसाममध्ये एकाच शाळेत झाले होते. अनुष्काकडे तो फोटोही आहे ज्यामध्ये फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशनमध्ये साक्षी परी तर अनुष्का तिच्या पसंतीच्या घाघरा-चोली ड्रेसमध्ये दिसते. 

 

पुढील स्लाइडमध्ये पाहा, दोघींचे फोटो...

बातम्या आणखी आहेत...