आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Anushka Sharma And Virat Kohli Are Getting Married At This Beautiful Italian Vineyard

येथे झाला विराट-अनुष्काचा विवाह सोहळा, या रिसॉर्टमध्ये ओबामा मिशेलसह आले होते व्हॅकेशनवर

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
येथे होणार अनुष्का शर्मा - विराट कोहलीचे लग्न. - Divya Marathi
येथे होणार अनुष्का शर्मा - विराट कोहलीचे लग्न.

मुंबई - अनुष्का शर्मा आणि विराट कोहलीने सोमवारी इटलीतील बर्गो फिनेशिटो येथे सिक्रेट मॅरेज केले आहे. सोमवारी रात्री दोघांनी ट्विट करुन लग्नाची माहिती शेअर केली.  या अतिशय खासगी विवाह सोहळ्यासाठी अनुष्का-विराटने फार मोजक्या लोकांना निमंत्रित केले होते.  इटलीतील मिलान शहराजवळील बोर्गो फिनोशिटो रिसॉर्ट येथे हा शाही विवाहसोहळा झाला.

 

असे केले ट्विट... 

लग्नांतर अनुष्का-विराटने ट्विट करुन स्वतः लग्नाची माहिती दिली. ट्विटमध्ये म्हटले, 'आम्ही एकमेकांना सदैव प्रेमबंधनात राहाण्याचे वचन दिले आहे. चाहते, आप्तांच्या प्रेमाने हा दिवस आणखीच खास झाला आहे. आमच्या आयुष्याचा या सुंदर वळणावर तुम्ही आमच्या सोबत आहात, यासाठी सर्वांचे धन्यवाद.' या पॅकेजमध्ये आम्ही तुमच्यासाठी या लक्झरी रिसॉर्टचे निवडक फोटो घेऊन आलो आहोत. 

 

एकावेळी 44 लोक जाऊ शकतात येथे.. 
- बोर्गो फिनोशिटो रिसॉर्ट एक वाइनयार्ड आहे. येथे अंगूर बागा आहेत. 
- अनुष्का-विराटने लग्नासाठी अंगुराचे शेत निवडण्यामागे स्पेशल कारण आहे. अनुष्काने  'हार्पर बाजार ब्राइड' या मॅगझीनला दिलेल्या मुलाखतीत सांगितले होते, की तिला तिच्या लग्नाचे डेस्टिनेशन वाइनयार्ड असले तर खूप आवडेल. तिची ही आवड लक्षात घेऊनच विराटने हे ठिकाण निवडले असावे. 
- हे रिसॉर्ट मिलान शहरापासून 4-5 तासांच्या अंतरावर आहे. या रिसॉर्टचा असा नियम आहे की येथे एकावेळी फक्त 44 लोकच येऊ शकतात. सचिन-शाहरुखसह जवळपास 50 लोक या लग्नाला हजर असल्याची माहिती आहे.
- बोर्गो फिनोशिटो हे इटलीतील प्रसिद्ध रिसॉर्ट आहे. याची ख्याती जगभरात असल्याचे एका उदाहरणावरुन लक्षात येईल. अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा पत्नी मिशेलसोबत व्हॅकेशनवर याच डेस्टिनेशनवर आले होते. 

 

पुढील स्लाइडमध्ये पाहा, रिसॉर्टचे In-Side PHOTOS..

बातम्या आणखी आहेत...