आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

साखरपुडा, मेंदी, हळदीपासून ते लग्नापर्यंत, बघा \'विरुष्का\'च्या Wedding Albumमधील 35 फोटोज

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

चाहत्यांची लाडकी जोडी विरुष्का म्हणजेच भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा 11 डिसेंबर रोजी साताजन्माच्या गाठीत अडकले. गेल्या आठवड्याभरापासून या दोघांच्या लग्नाची जोरदार चर्चा होती.  अखेर सोमवारी संध्याकाळी विराट आणि अनुष्काने त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून ते विवाहबंधनात अडकल्याचे जाहीर केले. इटलीतील टस्कनी येथे हा विवाहसोहळा पार पडला. 


विराट कोहलीने ट्विट करत म्हटले की, ‘आज आम्ही आयुष्यभर एकमेकांच्या प्रेमात राहण्यातचे वचन दिले. ही गोष्ट चाहते, मित्र- परिवारासोबत शेअर करताना अत्यानंद होत आहे. तुमच्या सदिच्छा अशाच आमच्या पाठिशी राहो. आमच्या आयुष्याचा महत्त्वपूर्ण भाग झाल्याबद्दल धन्यवाद.’


लग्नानंतर आता अनुष्का आणि विराट दोन वेडिंग रिसेप्शन देणार आहेत. यापैकी एक रिसेप्शन 21 डिसेंबर रोजी दिल्लीत होणार असून दुसरे रिसेप्शन 26 डिसेंबर रोजी मुंबईत होणार आहे. मुंबईत होणा-या रिसेप्शन पार्टीत सचिन तेंडुलकर, युवराज सिंह, हरभजन सिंह, रोहित शर्मा, महेंद्र सिंह धोनी सहभागी होऊ शकतात. तर बॉलिवूडमधून आदित्य चोप्रा, राणी मुखर्जी, अमिताभ बच्चन, शाहरुख खान, आमिर खान सहभागी होण्याची शक्यता आहे.


अनुष्का शर्मा आणि विराट कोहली यांचे वेडिंग ड्रेसेस प्रसिद्ध फॅशन डिझायनर सब्ससाची यांनी डिझाइन केले. अनुष्का लाइट पिंक कलरच्या लहेंग्यात अतिशय सुंदर दिसली. तर विराटने लग्नात ऑफ व्हाइट कलरची शेरवानी परिधान केली होती. तर साखरपुड्याला विराट सूटमध्ये दिसला तर अनुष्कासाठी वेलवेटची रेड कलरची साडी डिझाइन करण्यात आली होती. मेंदी सेरेमनीत अनुष्काने डिझायनर ड्रेस परिधान केला होता. 


पाहुयात, चाहत्यांच्या लाडक्या विरुष्काचे वेडिंग अल्बममधील हे खास फोटोज... 

बातम्या आणखी आहेत...