आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अनुष्का-विराटने लग्नात घातले महागडे डिझायनर Dresses, कपड्यांवर खर्च केला पाण्यासारखा पैसा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अनुष्का शर्माने साखरपुडा आणि विवाह सोहळ्यात डिझायनर सब्यसाची मुखर्जींनी डिझाइन केलेली साडी आणि लहेंगा परिधान केला होता. - Divya Marathi
अनुष्का शर्माने साखरपुडा आणि विवाह सोहळ्यात डिझायनर सब्यसाची मुखर्जींनी डिझाइन केलेली साडी आणि लहेंगा परिधान केला होता.

मुंबईः अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि क्रिकेटपटू विराट कोहली सोमवारी विवाहबद्ध झाले. दोघांनी आपल्या लग्नावरच नव्हे तर वेडिंग ड्रेसेसवर पाण्यासारखा पैसा खर्च केला. सूत्रांच्या माहितीनुसार, अनुष्का आणि विराट यांचे साखरपुडा, मेंदी आणि वेडिंग ड्रेसेसवर तब्बल 50 लाखांहून अधिकचा खर्च झाला आहे. शिवाय अनुष्काच्या दागिन्यांवरही कोट्यवधी रुपये खर्च झाले आहेत. कारण अनुष्कासाठी खास हेरिटेड डायमंड ज्वेलरी तयार करण्यात आली होती. 

 

67 कारागिरांनी तयार केला अनुष्काचा ब्राइडल लहेंगा... 

- अनुष्का शर्माने लग्नामध्ये प्रसिद्ध फॅशन डिझायनर सब्यसाची मुखर्जीने डिझाइन केलेला लहेंगा परिधान केला होता. हा लहेंगा तयार करण्यासाठी 67 कारागिरांनी 32 दिवस मेहनत केली होती. पिंक लहेंग्यावर रेनिसन्सची एम्ब्रॉयडरी केलेली होती. यामध्ये सोने आणि चांदीसोबतच मेटच्या धाग्यांचा वापर करण्यात आला होता. त्यावर पर्लस् आणि बिड्सची सजावट होती. 

- अनुष्काने लग्नामध्ये जो नेकलेस घातला होता तो अनकट डायमंड आणि पर्ल चोकर यापासून तयार केलेला होता. तिचे इअररिंग आणि इतरही ज्वेलरी अनकट डायमंडची होती.


साखरपुड्यात नेसली वेलवेटची साडी
- साखरपुड्यात अनुष्का साडीमध्ये होती. मरुन कलरच्या वेलवेटच्या साडीमध्ये अनुष्का अधिकच सुंदर दिसत होती. तिने तिचा लूकला हेवी नेकलेस आणि ईअररिंगने पूर्णत्व दिले होते. त्यासोबतच केसांमध्ये लाल गुलाब माळले होते आणि लाल बिंदीही होती.


ग्राफिक्स फ्यूशिया लहेंगा
मेंदी सेरेमनीमध्ये अनुष्काने पिंक आणि ऑरेंज कलरचा ग्राफिक्स फ्यूशिया लहेंगा स्कर्ट परिधान केला होता. त्याला किंमती खड्यांनी डिझाइन केलेगेले होते. लहेंग्यावर अनुष्काने फ्लोरल प्रिंटचा टॉप घातला होता. त्यासोबत हेवी झुमके होते. तो अनकट डायमंड आणि Iranian turquoise, जपानी पर्लने तयार केलेला होता. यावेळी अनुष्काने न्यूड मेकअप केला होता, आणि केस मोकळे सोडले होते.

 

पुढील स्लाइडमध्ये पाहा,  अनुष्का आणि विराट यांच्या वेडिंग ड्रेसेसचे PHOTOS...

बातम्या आणखी आहेत...