आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोन्यापासून बनली अनुष्काची \'लाख\'मोलाची साडी, दागिने-साडीची किंमत जाणून व्हाल अवाक्!

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि क्रिकेटपटू विराट कोहली यांचे लग्न, वेडिंग रिसेप्शन सध्या चर्चेचा विषय ठरले आहे. या दोघांच्या डेस्टिनेशन वेडिंगपासून ते गुरुवारी रात्री दिल्लीत झालेल्या वेडिंग रिसेप्शनपर्यंत, सर्वच काही लक्ष वेधून घेणारे ठरले. टस्कनीमध्ये झालेल्या लग्नात विरुष्काने प्रसिद्ध डिझायनर सब्यासाचीने डिझाइन केलेले कपडे घातले होते. तेव्हापासून त्यांचे कपडे, ज्वेलरी या सगळ्याचीच चर्चा होत आहे. काल दिल्लीत त्यांचे वेडिंग रिसेप्शन पार पाडले. यावेळीही या दोघांच्या लूकमागे सब्यासाचीचाच हात होता. विरुष्काचा या रिसेप्शन पार्टीत शाही अंदाज बघायला मिळाला. 

 

अनुष्काने लाल आणि सोनेरी रंगाची सब्यासाचीने डिझाइन केलेली साडी नेसली होती. वजनदार आणि जडाऊ दागिने, केसात मोगऱ्याचा गजरा, भांगेत कुंकू यामुळे अनुष्काच्या सौंदर्यात अधिकच भर पडली होती. विराटने काळ्या रंगाची अचकन, पांढरा चुडीदार आणि त्यावर नक्षीकाम केलेली शाल घेतली होती. या रिसेप्शनचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून, अनुष्काने घातलेल्या वजनदार दागिन्यांसोबतच तिच्या साडीची सर्वाधिक चर्चा होत आहे.


बनासरमध्ये तयार झाली अनुष्काची साडी... 

अनुष्काची लाल रंगाची ही बनारसी साडी बनारसच्या पीलीकोठी परिसरात तयार झाली होती. ज्यांनी ही साडी तयार केली, त्या कुटुंबाची DainikBhaskar.com च्या टीमने भेट घेतली. बनारसी साडीचे व्यवसायी मकबूल हसन यांनी सांगितले, ''अनुष्काची साडी बनवताना त्यासाठी सोन्याचा वापर करण्यात आला आहे. साडीला सोन्याची जरी आहे. या साडीला तयार करण्यासाठी सहा महिन्यांचा कालावधी लागला आणि याची किंमत पाच लाखांपेक्षा अधिक आहे."


विशेष म्हणजे यापूर्वी या मकबूल हसन यांच्या कुटुंबीयांनी ऐश्वर्यासाठी बनारसी साडी, अभिषेक बच्चनसाठी शेरवानी तयार केली होती. अमिताभ बच्चन यांच्याकडूनच शॉल मागवत असतात.  

 

पुढे वाचा, कशी तयार झाली अनुष्काची लाखमोलाची साडी...
काय आहे साडीचे वैशिष्ट्... 

किती आहे अनुष्काच्या डायमंड दागिन्यांची किंमत... यासह बरंच काही... 

बातम्या आणखी आहेत...