आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारतात परतली अनुष्काची फॅमिली, एअरपोर्टवर दिसले आईवडील आणि भाऊ

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एअरपोर्टवर अनुष्काची आई अशीमा, वडील अजय कुमार आणि भाऊ कर्णेश शर्मा - Divya Marathi
एअरपोर्टवर अनुष्काची आई अशीमा, वडील अजय कुमार आणि भाऊ कर्णेश शर्मा


मुंबईः इटलीत झालेल्या लग्नानंतर अनुष्का शर्माचे कुटुंबीय भारतात परतले आहेत. अलीकडेच अनुष्काची आई अशीमा, वडील अजय कुमार आणि भाऊ कर्णेश शर्मा भरपूर लगेजसोबत मुंबई विमानतळावर दिसले. 11 डिसेंबर रोजी अनुष्का शर्मा आणि विराट कोहली यांनी इटलीत गुपचुप लग्न थाटले. या विवाहसोहळ्यात निवडक लोक सहभागी झाले होते. 


हनीमूनसाठी रवाना झाले कपल...
- न्यूली वेड्स कपल अनुष्का शर्मा आणि विराट कोहली रोममध्ये हनीमून साजरा करत आहेत.
- रिपोर्ट्सनुसार, हे दोघे आठवडाभर येथे हनीमून साजरा करणार आहेत. त्यानंतर भारतात त्यांचे दोन वेडिंग रिसेप्शन ठेवण्यात आले आहेत.


येथे होणार आहे वेडिंग रिसेप्शन...
- पहिले वेडिंग रिसेप्शन 21 डिसेंबर रोजी दिल्लीत होणार आहे. विराट आणि अनुष्का यांच्या नातेवाईकांसाठी हे रिसेप्शन ठेवण्यात आले आहे. तर दुसरे रिसेप्शन 26 डिसेंबर रोजी मुंबईत होणार आहे. मुंबईतील पार्टीत बॉलिवूड आणि क्रिकेट जगतातील सेलिब्रिटी सहभागी होणार आहेत.
- मुंबईतील रिसेप्शनला सचिन तेंडुलकर, युवराज सिंह, हरभजन सिंह, रोहित शर्मा, महेंद्र सिंह, आदित्य चोप्रा, राणी मुखर्जी, अमिताभ बच्चन, शाहरुख खान, आमिर खानसह अनेक मान्यवर सहभागी होणार आहेत.


पुढील स्लाईड्सवर बघा, एअरपोर्टवर क्लिक झालेले अनुष्काच्या फॅमिली मेंबर्सचे PHOTOS...

बातम्या आणखी आहेत...