आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अनुष्का, ऐश्वर्यापासून शिल्पापर्यंत, लग्नात अशा नटल्या होत्या या 12 फेमस अॅक्ट्रेसेस

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवुड अभिनेत्री अनुष्का शर्मा 11 डिसेंबर रोजी क्रिकेटपटू विराट कोहलीसोबत लग्नाच्या बेडीत अडकली. या दोघांनी इटलीत लग्न थाटले. लग्नानंतर अनुष्का तिच्या आगामी चित्रपटांमध्ये बिझी होणार आहे. संजू आणि परी हे तिचे आगामी चित्रपट असून 2018 मध्ये प्रदर्शित होणार आहेत. 

 

4 वर्षांच्या डेटिंगनंतर अनुष्का-विराटने केले लग्न... 
अनुष्का शर्मा आणि विराट कोहली यांनी चार वर्षांच्या डेटिंगनंतर लग्न केले. लग्नासाठी फॅशन डिझायनर सब्ससाची मुखर्जी यांनी दोघांचे आउटफिट डिझाइन केले होते. अनुष्काने लग्नात परिधान केलेला लहेंगा तयार करण्यासाठी 67 कारागिरांनी 32 दिवस मेहनत केली होती. पिंक लहेंग्यावर रेनिसन्सची एम्ब्रॉयडरी केलेली होती. यामध्ये सोने आणि चांदीसोबतच मेटच्या धाग्यांचा वापर करण्यात आला होता. त्यावर पर्लस् आणि बिड्सची सजावट होती. 


आज या पॅकेजमधून आम्ही तुम्हाला बॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्रींचे वेडिंग लूक दाखवत आहोत.. 

 

ऐश्वर्या राय बच्चन आणि अभिषेक बच्चन
ऐश्वर्या राय बच्चन आणि अभिषेक बच्चन यांच्या लग्नाला दहा वर्षे पूर्ण झाली आहेत. एप्रिल 2007 मध्ये हे दोघे विवाहबंधनात अडकले होते. दोघांची पहिली भेट 2000 मध्ये रिलीज झालेल्या 'ढाई अक्षर प्रेम के' या चित्रपटाच्या सेटवर झाली होती. असे म्हटले जाते, की  'गुरु' (2007) या चित्रपटाच्या सेटवर अभिषेकने ऐश्वर्याला प्रपोज केले होते. प्रसिद्ध फॅशन डिझायनर नीता लुल्ला यांनी ऐश्वर्यासाठी लग्नाची साडी डिझाइन केली होती. शिवाय ऐश्वर्याने लग्नात रेड आणि गोल्ड जरी असलेला लहेंगा घातला होता. तर अभिषेकने अबू जानी आणि संदीप खोसला यांनी डिझाइन केलेल्या व्हाइट कलरच्या शेरवानीची निवड केली होती. ऐश्वर्या आणि अभिषेक यांना एक मुलगी असून आराध्या हे तिचे नाव आहे. 


पुढील स्लाईड्सवर बघा, लग्नात कसा होता बॉलिवूड अभिनेत्रींचा लूक... 

बातम्या आणखी आहेत...