आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विराटसोबत व्हॅलेन्टाइन डे साजरा करु शकणार नाही अनुष्का, हे आहे कारण

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अॅक्ट्रेस अनुष्का शर्मा लग्नानंतरचा पहिला व्हेलेन्टाइन डे हसबँड क्रिकेटर विराट कोहलीसोबत साजरा करु शकणार नाही. कारण अनुष्काचा आगामी चित्रपट 'सुई-धागा' ची शूटिंग व्हॅलेन्टाइन डेला सुरु होणार आहे. हा दिवस ती विराटसोबत नाही तर चित्रपटाचा हिरो वरुण धवनसोबत सेलिब्रेट करेल. अनुष्का-विराटने डिसेंबरमध्ये लग्न केले होते. सोशल मीडियावरुन त्यांनी लग्नाची माहिती कळवली होती. नंतर दिल्ली आणि मुंबईमध्ये दोघांचा ग्रँड रिसेप्शन सोहळा पार पडला होता. शिवणकाम शिकतेय अनुष्का...


- अनुष्का शर्मा सध्या आगामी चित्रपट 'सुई-धागा' साठी शिवणकाम शिकतेय. यासाठी तिने वर्कशॉप घेणेही सुरु केलेय. नुकताच तिचा एक फोटो समोर आलाय यामध्ये ती शिवणकाम करताना दिसतेय. यासोबतच चित्रपटासंबंधीत अजून एक फोटो समोर आलाय. यामध्ये अनुष्का सिंपल कॉटनच्या ब्लू रंगाच्या साडीमध्ये दिसतेय. यामध्ये ती विना मेकअप दिसतेय. चित्रपटात अनुष्का वरुणसोबत लीड रोल प्ले करतेय. वरुण धवनचाही एक फोटो समोर आला होता. यामध्ये तो शिलाई मशीन चालवताना दिसला होता.


- शरत कटारिया हे 'सुई-धागा' चित्रपटाचे डायरेक्टर आहेत. तर आदित्य चोप्रा आणि मनीष शर्मा प्रोड्यूसर आहेत. 
- हा चित्रपट अशा दोन व्यक्तीची कथा आहे, जे आपल्या बळावर सर्वकाही करु शकतात. हा चित्रपट सप्टेंबर 2018 मध्ये रिलीज होणार आहे. 
- अनुष्काने आपला आगामी चित्रपट 'झिरो' ची शूटिंग जवळपास पुर्ण केली आहे.

 

पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा 'सुई-धागा' चित्रपटासंबंधीत समोर आलेले काही फोटोज...


(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

 

 

बातम्या आणखी आहेत...