आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अनुष्का शर्माच्या आधी दीपिकाने या मराठी सोहळ्यात घातले होते हे झुमके, PHOTOS

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दीपिका पादुकोणने आधी वापरले होते अनुष्का शर्माने घातलेले झुमके. - Divya Marathi
दीपिका पादुकोणने आधी वापरले होते अनुष्का शर्माने घातलेले झुमके.

मुंबई - अनुष्का शर्मा आणि विराट कोहली यांचे सोमवारी (11 डिसेंबर 2017) इटलीतील बोर्गो फिनोशिटो येथील रिसॉर्टमध्ये लग्न झाले. या विवाह सोहळ्याला जवळपास 50 पाहुणे निमंत्रित होते. लग्नामध्ये अनुष्काने डिझायनर सब्यसाचीने डिझाइन केलला लहेंगा आणि ज्वेलरी घातली होती. तुम्ही जर बारकाईने अनुष्काने लग्नात घातलेल्या झुमके पाहिले तर तुमच्या लक्षात येईल की हे झुमके याआधी दीपिका पादुकोणने वापरलेला आहे. 
 
 मराठी फिल्मफेअर अवॉर्डमध्ये दीपिकाने घातला होता झुमका
 - अनुष्का शर्माने तिच्या लग्नात जे झुमके घातले होते तेच झुमके दीपिकाने याच वर्षी ऑक्टोबरमध्ये मुंबईत झालेल्या मराठी फिल्मफेअर अवॉर्डमध्ये घातले होते. 
- वास्तविक एका सेलेब्सची ज्वेलरी आणि आउटफिट दुसऱ्याने वापरण्याची ग्लॅमर जगतातील ही काही पहिली घटना नाही, याआधीही असे अनेकदा घडले आहे.
-  अनुष्का शर्माने लग्नामध्ये डिझायनर सब्यसाचीने डिझाइन केलेला लहेंगा परिधान केला होता. हा लहेंगा तयार करण्यासाठी 67 कारागिरांनी 32 दिवस मेहनत केली होती. पिंक लहेंग्यावर रेनिसन्सची एम्ब्रॉयडरी केलेली होती. यामध्ये सोने आणि चांदेचे त्यासोबतच मेटच्या धाग्यांचा वापर करण्यात आला होता. त्यावर पर्लस् आणि बिड्सची सजावट होती. 
- अनुष्काने लग्नामध्ये जो नेकलेस घातला होता तो अनकट डायमंड आणि पर्ल चोकर यापासून तयार केलेला होता. तिची इअररिंग आणि इतरही ज्वेलरी अनकट डायमंडची होती.

अनुष्का एक्स तर दीपिका प्रेझेंट गर्लफ्रेंड 
- अनुष्का शर्मा आणि रणवीर सिंह यांच्या रिलेशनशिपबद्दल बरीच चर्चा होती. रणवीर-अनुष्काने बँड बाजा बारात (2010) मध्ये स्क्रिन शेअर केली होती. त्यानंतर 'लेडीज वर्सेस रिकी बहल' (2011), 'दिल धड़कने दो' (2015) मध्येही दोघे सोबत होते. 
- सध्या दीपिका पादुकोण रणवीरची गर्लफ्रेंड आहे. दोघांनी 'गोलियों की रासलीला राम-लीला' (2013), 'बाजीराव मस्तानी' (2015) आणि या दोघांची सध्या वादग्रस्त ठरत असलेली फिल्म 'पद्मावती' येऊ घातली आहे. 

 

पुढील स्लाइडमध्ये पाहा अनुष्काने लग्नात घातलेली ज्वेलरी... 

बातम्या आणखी आहेत...