आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

\'भागमती\'चा ट्रेलर रिलीज, अंगावर शहारा आणणारी आहे अनुष्का शेट्टीचा भूमिका

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई/हैदराबाद: 'बाहुबली' या चित्रपटात देवसेनेची भूमिका वठवणारी अभिनेत्री अनुष्का शेट्टीच्या आगामी 'भागमती'  या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. या चित्रपटात अनुष्काचे नवीन रुप बघायला मिळणार आहे. या चित्रपटात अनुष्कावर भूतप्रेताची सावली असल्याचे दाखवण्यात आले आहे. तिची भूमिका अंगावर शहारा आणणारी आहे. हा चित्रपट तेलुगु, तामिळ आणि मल्याळममध्ये रिलीज होणार आहेत.


26 जानेवारी रोजी रिलीज होणार भागमती...
- अशोक के दिग्दर्शित भागमती या चित्रपटाचे संगीतकार एस.थमन आहेत. येत्या 26 जानेवारी रोजी हा चित्रपट रिलीज होतोय. बाहुबली नंतर रिलीज होणारा अनुषअकाचा हा पहिला चित्रपट आहे.
- या चित्रपटात अनुष्कासह उन्नी मुकुंदन, जयराम, आशा सरथ आणि आदि पिनिशेट्टी या कलाकारांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत.  वामसी कृष्णा रेड्डी यांनी चित्रपटाची निर्मिती केली आहे.
- 'भागमती'च्या रिलीजच्या आदल्या दिवशी म्हणजे 25 जानेवारीला दीपिका पदुकोणचा 'पद्मावत' आणि अक्षय कुमारचा 'पॅडमॅन' हे चित्रपट रिलीज होत आहेत. 

 

पुढील स्लाईड्सवर बघा, 'भागमती' या चित्रपटातील अनुष्काचे लूक... 

बातम्या आणखी आहेत...