आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करा
बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि भारतीय क्रिकेट टीमचा कॅप्टन विराट कोहली यांचा 26 डिसेंबर रोजी मुंबईत शानदार रिसेप्शन पार पडले. या रिसेप्शन पार्टीत बॉलिवूड आणि क्रिकेट जगतातील अनेक मान्यवरांनी उपस्थिती लावली होती. सचिन तेंडुलकर, रवी शास्त्री, अनिल कुंबळे, हरभजन सिंग, युवराज सिंग,अमिताभ बच्चन, ऐश्वर्या-अभिषेक बच्चन, कंगना रनोट, रेखा यांच्या अनेक सेलिब्रिटींनी नवविवाहित दाम्पत्याला शुभेच्छा द्यायला उपस्थिती लावली होती. प्रसिद्ध संगीतकार ए. आर. रहमान हेदेखील त्यांच्या पत्नीसोबत या सोहळ्याला उपस्थित होते. पण या रिसेप्शनमध्ये अनुष्का-विराट यांच्यासोबत क्लिक केलेल्या एका सेल्फीमुळे ए. आर. रहमान सोशल मीडियावर ट्रोल होत आहेत.
काय घडले नेमके..
ए.आर. रहमान पत्नीसह नवदाम्पत्यांना भेटायला स्टेजवर गेले होते. तेथे त्यांनी अनुष्का-विराट आणि पत्नीसोबत एक सेल्फी क्लिक केला. या सेल्फीत ते सर्वात पुढे आणि त्यांच्या मागे विराट, अनुष्का आणि त्यांची पत्नी उभे होते. या सेल्फीमध्ये चुकून फक्त रहमानच फोकस झाले आणि त्यांच्या मागे उभे असलेले सर्वजण ब्लर झाले. रहमान यांनी हा फोटो त्यांच्या इंस्टाग्रामवर शेअर केला आणि तेव्हापासून ते ट्रोल होत आहे. माणसाने नेहमी स्वतःलाच महत्त्व द्यावे असेही काहींनी मेसेजमध्ये लिहिले आहे.
बघा, अनुष्का-विराटच्या रिसेप्सनमधील ए. आर. रहमान यांची छायाचित्रे...
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.