आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राणा दग्गुबाती या अॅक्ट्रेसला करतोय डेट? अनेक वेळा दिसतात एकत्र

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

काही सेलेब्स एकत्र दिसले तर त्यांच्या अफेअर्सच्या चर्चा बी-टाउनमध्ये पसरण्यास वेळ लागत नाही. गेल्या काही दिवासांपासून 'बाहुबली' फेम राणा दग्गुबाती रकुल प्रीत सिंहला डेट करतोय अशा चर्चा आहेत. एका लीडिंग दैनिकाने याविषयी रकुलसोबत चर्चा केली तर तिने सांगितले की, आम्ही फक्त चांगले मित्र आहोत. गरजेच्या वेळी नेहमीच हजर असतो राणा...


- रकुलने सांगितले, "आम्ही ब-याच दिवसांपासून या अफवा ऐकत आहोत, परंतू हसण्याव्यतिरिक्त आम्ही काहीच करु शकत नाही. राणा आणि मी फक्त चांगले मित्र आहोत. मला जेव्हा गरज असते तेव्हा तो हजर असतो. मी हैदराबादमध्ये आपल्या फॅमिलीपासून दूर राहते. येथे आमचा 15-20 मित्रांचा ग्रुप आहे. मी आणि राणा, दोघेही या ग्रुपमध्ये आहोत. आम्ही शेजारी राहतो आणि नेहमीच भेटतो. आमच्या ग्रुपमध्ये काही लोक सिंगल आहेत आम्हीही त्यामधूनच एक आहोत. सिंगल लोक एकत्र आले की अशा अफवा पसरतातच..."

- रकुल म्हणाली की, "मला माझ्या करिअरवर फोकस करायचे आहे. प्रेम झाले तर मी लपवण्याऐवजी सर्वांना सांगणे पसंत करेल." 
- राणा दग्गुबातीचे नाव यापुर्वी श्रेया शरणसोबत जोडले गेलेय. श्रेया नेहमीच म्हणत आली की, आम्ही दोघे फक्त चांगले मित्र आहोत. 


पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा राणा दग्गुबाती आणि रकुलचे काही फोटोज...


(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

 

बातम्या आणखी आहेत...