आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Arijit Singh Birthday Special: Arijit Singh Divorce And Second Marriage With Single Mother

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

वर्षभरातच झाला होता अरिजीत सिंगचा पहिला घटस्फोट, नंतर एका मुलीच्या आईसोबत थाटले लग्न

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दुसरी पत्नी कोयल रॉयसोबत अरिजीत सिंग - Divya Marathi
दुसरी पत्नी कोयल रॉयसोबत अरिजीत सिंग

एन्टरटेन्मेंट डेस्कः बॉलिवूडमध्ये एकामागून एक हिट गाणे देणारा अरिजीत सिंगचा आज (25 एप्रिल) वाढदिवस असून तो 31 वर्षांचा झाला आहे. 'आशिकी 2' या चित्रपटातील गाण्यांमुळे एका रात्रीतून लाइमलाइटमध्ये आलेल्या अरिजीतने आतापर्यंत दोनशेहून अधिक गाणी स्वरबद्ध केली आहेत. अरिजीतला स्वतःच्या खासगी आयुष्याविषयी बोलणे पसंत नाही. त्याचे दोनदा लग्न झाले आहे. पहिल्या पत्नीपासून घटस्फोट घेतल्यानंतर अरिजीतने एका मुलीची आई असलेल्या महिलेसोबत दुसरे लग्न थाटले. त्याची दुसरी पत्नी कोयल ही त्याची बालपणीची मैत्रीण आहे.

 

वर्षभरातच मोडला पहिला संसार, नंतर गुपचुप थाटले होते दुसरे लग्न..
- एका म्युझिक प्रोग्राममध्ये त्याची को-कंटेस्टेंट राहिलेल्या कोयल सिंहसोबत 2013 साली गुपचुप लग्न थाटले होते. पण हे लग्न फार काळ टिकले नाही. 
- 2013 मध्ये दोघांचा घटस्फोट झाला. त्यानंतर 2014 मध्ये अरिजीतने त्याची बालपणीची मैत्रीण कोयल रॉयसोबत दुसरे लग्न थाटले. 
- बंगाली पद्धतीने दोघांचे लग्न झाले होते. अरिजीतने आपल्या दुस-या लग्नाची बातमी मीडियापर्यंत पोहोचू दिली नव्हती. अगदी गुपचुप त्याने लग्न थाटले होते. 
- कोयल आणि अरिजीत यांचे हे दुसरे लग्न होते. पहिल्या लग्नापासून कोयलला एक मुलगी आहे. - विशेष म्हणजे अरिजीतच्या दोन्ही पत्नींचे नाव कोयल आहे. लग्नाच्या काही महिन्यांनी अरिजीने सोशल मीडियावर दुस-या लग्नाची छायाचित्रे पोस्ट करुन लग्नाची बातमी दिली होती. 
- एका मुलाखतीत मीडियाने त्याला लग्नाविषयी विचारले असता, त्याने खासगी आयुष्यावर बोलण्यास स्पष्ट नकार दिला होता.  

 

वादासोबत आहे अरिजीतचे जुने नाते... 
- अरिजीत सिंगचे वादासोबतही जवळचे नाते आहे. 2013 मध्ये एका मुलाखतीदरम्यान तो रिपोर्टवर भडकला होता. त्यामुळे त्याला अटक झाली होती.
- 2015 मध्ये त्याला गँगस्टर रवी पुजारीकडून पाच कोटींच्या खंडणीसाठी धमकीचा फोन आला होता. पण अरिजीतने यासंदर्भात पोलिसांकडे तक्रार केली नव्हती. 


पुढील स्लाईड्सवर बघा, अरिजीत सिंगचे दुसरी पत्नी कोयलसोबतचे फोटोज आणि वाचा, सलमान खानसोबतचा अरिजीतचा वाद आला होता चव्हाट्यावर... 

बातम्या आणखी आहेत...