आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

33 वर्षीय नातवाच्या लग्नाची आजीला लागली आहे चिंता, पत्र पाठवून म्हटले, लवकर लग्न कर

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


मुंबईः अभिनेता अर्जुन कपूरने 26 जून रोजी वयाची 33 वर्षे पूर्ण केली. श्रीदेवी यांच्या निधनानंतर अर्जुनने पहिल्यांदाच त्याचा वाढदिवस वडील बोनी कपूर आणि सावत्र बहिणी जान्हवी-खुशीसोबत साजरा केला. अर्जुनच्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्याची आजी निर्मल कपूर (वडिलांची आई) यांनी त्याला एक खास भेटवस्तू पाठवली होती. अर्जुनने आजीने पाठवलेल्या गिफ्टचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. 


आजीने लिहिले अर्जुनला पत्र...
- अर्जुनच्या वाढदिवसाला त्याच्या आजीने एक पत्र लिहून प्रेमळ धमकी दिली आहे. 
- सोनमच्या पावलावर पाऊल ठेवत अर्जुननेही लवकरात लवकर लग्न करावे, अशी इच्छा त्याच्या आजीने व्यक्त केली आहे. अर्जुनला त्याच्या आजीकडून हे पत्र भेटवस्तूच्या रुपात मिळाले आहे.
- अर्जुनने आजीच्या पत्राचा फोटो पोस्ट करुन लिहिले, "विथ लव दादी, जल्दी शादी करो।" 
- अर्जुनच्या या इंस्टाग्राम पोस्टवर त्याचा चुलत भाऊ हर्षवर्धन कपूरने कमेंट केले, "Another wedding to attend.. damn"। 
- अर्जुन सध्या त्याच्या आगामी 'नमस्ते इंग्लंड' आणि 'संदीप और पिंकी फरार' या चित्रपटांच्या शूटिंगमध्ये बिझी आहे. 


असा आहे अर्जुनचा मॅरेज प्लान...  
- अर्जुनने 33व्या वाढदिवसाच्या निमित्ताने पहिल्यांदाचा त्याचा मॅरेज प्लान मीडियाला सांगितला. एका मुलाखतीत पुढच्या दोन ते तीन वर्षांत लग्न करणार असल्याचे त्याने सांगितले.

- अर्जुन म्हणाला, "माझ्या कुटुंबात सुरु असलेले एकामागून एक लग्न अटेंड करुन मी दमलो आहे. पहिले मोहित मारवाह मग सोनम कपूक... त्यामुळे थोडा ब्रेक घेऊन मला लग्न करावे लागेल."  

बातम्या आणखी आहेत...