आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

श्रीदेवींच्या मृत्यूनंतर अर्जुन कपूरने जान्हवी-खुशीला असा केला सपोर्ट

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री श्रीदेवी यांचे शनिवारी निधन झाले. त्यांच्या अकाली जाण्याने त्यांचे फॅन्सला मोठा धक्का बसला आहे. त्यांच्या मुली जान्हवी आणि खुशी या दोघींनाही हा मोठ्ठा धक्का आहे. आपल्या सावत्र बहिणींना बहिणी न मानना-या अर्जुन कपूरने या दोघींचे सात्वंन केलेय. तो आपल्या चित्रपटाची शूटिंग सोडून मुंबईमध्ये आला. तो एयरपोर्टवरुन सरळ घरीच गेला आणि या दुःखद प्रसंगी त्याने खुशी आणि जान्हवी यांच्याशी फोनवर बातचित करुन सांत्वन केले. 

 

एकेकाळी बहिणीही मानत नव्हते
सूत्रांनुसार बोनी कपूर यांनी पहिली बायको मोनाला सोडून श्रीदेवीसोबत लग्न केले होते. यावेळी अर्जुन कपूर सर्वात जास्त भडकला होता. तो म्हणाला होता की, जान्हवी आणि खुशी माझ्या बहिणी नाही. एका मुलाखतीत अर्जुन म्हणाला होता की, खुशी आणि जान्हवी माझ्या बहिणी नाही. आम्ही जास्त भेटत नाही आणि वेळही घातलवत नाही. हे नाते ग्राह्य धरले जात नाही. येवढेच नाही तर त्याला श्रीदेवी आवडतही नव्हत्या. तो म्हणाला होता की, श्रीदेवी ही फक्त माझ्या वडीलांची म्हणजे बोनी कपूरची वाइफ आहे. 

 

अर्जुन कपूर हा बोनी कपूरची पहिली पत्नी मोना कपूरचा मुलगा आहे. अर्जुनला एक बहिण आहे. तिचे नाव अंशुला आहे. जून 1996 मध्ये बोनीने श्रीदेवीसोबत दूसरे लग्न केले होते. या गोष्टींमुळे अर्जुन कपूरची आई म्हणजे मोना कपूरला खुप दुःख झाले होते. श्रीदेवीसोबत लग्न केल्यानंतर बोनी कपूर मोनापासून वेगळे झाले होते. अर्जुन कपूर सध्या 'नमस्ते इंग्लंड' ची शूटिंग करत आहेत.

 

पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा अऩि कपूरच्या घरी पोहोचलेल्या अर्जुन कपूरचे फोटोज...


(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

 

 

बातम्या आणखी आहेत...