आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Arjun Rampal Wife Mehr Jesia Some Lesser Known Facts अर्जुन रामपालसोबत लग्न केल्याने मेहरला धर्मातून करण्यात आले होते बेदखल

अर्जुन रामपालसोबत लग्न केल्याने मेहरला धर्मातून करण्यात आले होते बेदखल

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एंटरटेनमेंट डेस्कः अभिनेता अर्जुन रामपाल आणि त्याची पत्नी मेहर जेसिया आता एकत्र राहात नाहीत. अर्जुन त्याचे घर सोडून गेल्याचे वृत्त आहे. अर्जुन आणि मेहर यांच्या नात्यात ठिणगी पडल्याची गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा आहे. असे म्हटले जाते, की हृतिकची पुर्वाश्रमीची पत्नी सुझान खानसोबत अर्जुनची वाढती जवळीक त्याच्या संसारात वादळ घेऊन आली आहे. मेहरला अर्जुन आणि सुझान यांचे नाते पसंत नाही.

 

मेहर जेसिया ही सुपरमॉडेल होती. मेहरला सुपरमॉडेलपेक्षा अर्जुन कपूरच्या पत्नीच्या रुपातच लोक ओळखतात. लग्नापूर्वी मेहर मॉडेलिंग क्षेत्रात काम करत होती. पारसी असलेल्या मेहरने अर्जुन रामपालसोबत लग्न केले. पण लग्नानंतर तिच्या समाजाने तिला त्यांच्या धर्मातून बेदखल केले होते. मेहर पारसी तर अर्जुन हिंदू आहे.

 
मिस इंडियाचा किताब केला होता नावी...
- मेहरने बॉलिवूड क्षेत्रात पदार्पण केले नाही. पण मॉडेलिंगच्या दुनियेत खूप नाव कमावले.
-  तिने मॉडेलिंगच्या क्षेत्रात स्वतःचे वेगळे अस्तित्व निर्माण केले. 
- ती माजी मिस इंडिया आहे. 1986 मध्ये तिने मिस इंडियाचा किताब आपल्या नावी केला होता. तेव्हा ती फक्त 16 वर्षांची होती.
- फेमिना मिस इंडियाचा किताब आपल्या नावी केल्यानंतर मेहरने मॉडेलिंग क्षेत्रात पाऊल ठेवले होते.
- मेहरने एका मुलाखतीत सांगितले होते, की तिला कधीही अभिनेत्री व्हायचे नव्हे. मॉडेलिंग क्षेत्रातच तिला नाव कमवायचे होते. 


पुढील स्लाईड्सवर वाचा, अर्जुनची पत्नी मेहरविषयी बरंच काही....

बातम्या आणखी आहेत...