आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाना पाटेकरांसोबत बोल्ड सीन देऊन लाइमलाइटमध्ये आली होती ही अॅक्ट्रेस, आता करणार हा रोल

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
\'आंच\' या चित्रपटातील एका दृश्यात नाना पाटेकरसोबत आयशा जुल्का - Divya Marathi
\'आंच\' या चित्रपटातील एका दृश्यात नाना पाटेकरसोबत आयशा जुल्का

मुंबईः 90 च्या दशकातील  बॉलिवूडची आघाडीची आणि देखणी अभिनेत्री आयशा जुल्का दीर्घ काळानंतर चित्रपटांमध्ये पुनरागमन करत आहे. पण आता ती ग्लॅमरस भूमिका नव्हे तर आईची व्यक्तिरेखा साकारणार आहे. रिपोर्ट्सनुसार, आयशा 'गदर' या चित्रपटाचे दिग्दर्शक अनिल शर्मा यांच्या 'जीनियस' या चित्रपटातून कमबॅक करच आहे. अभिनेत्री इशिता चौहानच्या आईची व्यक्तिरेखा आयशा साकारणार आहे. आयशा चित्रपटसृष्टीत नाना पाटेकरांसोबत बोल्ड सीन दिल्याने चर्चेत आली होती. स्वतःपेक्षा वयाने 21 वर्षांनी मोठ्या नाना पाटकरांसोबत आयशाने बोल्ड सीन दिले होते.


या चित्रपटात नानासोबत दिले होते इंटीमेट सीन...
 - आयशा जुल्काला बॉलिवूडची सोज्वळ अभिनेत्री म्हणून ओळखले जाते. पण 2003 साली तिने नाना पाटेकरांसोबत 'आंच' या चित्रपटात अनेक बोल्ड सीन्स दिले होते.
- असे म्हटले जाते, की आयशा आणि नाना खासगी आयुष्यात रिलेशनशिपमध्ये होते. दोघे काही काळ लिव्ह इन रिलेशनशिपमध्येही राहिले होते. पण नानांच्या रागीट स्वभावामुळे आयशाने त्यांच्यासोबत नाते संपुष्टात आणल्याची चर्चा आहे.  
- इतकेच नाही तर अशीही चर्चा होती, की एकदा मनीषा कोईरालाने नाना आणि आयशा यांना एका खोलीत पकडले होते. त्यानंतर मनीषाने केवळ नाना पाटेकरांनाच नव्हे तर आयशालादेखील खडे बोल सुनावले होते. 


पुढील स्लाईड्सवर वाचा, स्वतःपेक्षा वयाने 22 वर्षांनी मोठ्या मिथून चक्रवर्तीची गर्लफ्रेंड होती आयशा...

बातम्या आणखी आहेत...