आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

'बाहुबली 2' ला झाले एक वर्ष, 500 लोकांनी 50 दिवसात तयार केला होता सेट

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : 2017 चा मोस्ट अवेटेड चित्रपट 'बाहुबली 2' ला नुकतेच एक वर्ष पुर्ण झाले. 28 एप्रिलला हा चित्रपट रिलीज झाला होता. चित्रपटाने वर्ल्डवाइड जवळपास 1800 कोटींची कमाई केली होती. चित्रपटाच्या फर्स्ट पार्टमध्ये माहिष्मती किंगडमचा सेट बनवण्यास 28 कोटी रुपये लागले होते. सीक्वलमध्ये त्याच सेटवर काही नवीन एलीमेंट्स जोडून चित्रपटाचे अनेक सीन्स घेण्यात आले होते. यासोबतच एक नवीन किंगडमचा सेट तयार करण्यात आला होता. याच्या प्रोडक्शन डिझाइनचा खर्च 35 कोटी रुपये आला होता. हा सेट 500 लोकांनी जवळपास 50 दिवसात तयार केला होता. 


सेकंड पार्टमध्ये दिसला माहिष्मतीचा इंटीरियर...
चित्रपटाच्या पहिल्या पार्टमध्ये माहिष्मतीच्या एक्सटीरिअरलाला एरियल व्ह्यूने दाखवण्यात आले होते. परंतू सेकंड पार्टमध्ये ऑडियन्सने याचे इंटीरिअर आणि एम्पायरचा विशाल व्ह्यू पाहिला. 'बाहुबली' मध्ये जमीनीवरील युध्दाचे अनेक सीक्वेंस दाखवण्यात आले होते. परंतू दूस-या पार्टमध्ये पाण्यात युध्दाचे सीन घेण्यात आले. चित्रपटात एक गाणे होते. जे जहाजेच्या बॅकग्राउंडला शूट करण्यात आले होते.

 

चिंबल वैली रिक्रिएट केले...
चित्रपटाचे क्रूशिअल सीक्वेंस हैदराबाद येथील रामोजी फिल्मसिटीमध्ये चित्रीत करण्यात आले. येथे चंबल वैलीचे एक मोठे सेट बनवण्यात आले होते. पहिला हा सीन ओरिजनल लोकेशनवर शूट करायचा होता. परंतू तेथे पावसामुळे हिरवळ झाली होती. यानंतर फिल्मसिटीमध्ये हे सीन चित्रीत करण्यात आले.


पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा, बाहुबली 2 च्या सेटवरचे बिहाइंड द सीन Photos...
 

(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

 

बातम्या आणखी आहेत...