आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हिरे व्यापा-याची मुलगी आहे तमन्ना, पहिल्यांदाच बघा आलिशान घराचे Inside Photos

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

हैदराबाद : 'बाहुबली' फेम अभिनेत्री तमन्ना भाटियावर अलीकडेच एका चाहत्याने बूट फेकल्याचा प्रकार समोर आला होता. तमन्नाचा चित्रपट न आवडल्यामुळे हैदराबादमधील या चाहत्याने थेट तिच्यावर बूट भिरकवला होता. तमन्ना हैदराबादच्या हिमायतनगरमध्ये एका ज्वेलरी शॉपच्या उद्घाटनाला गेली होती. त्यावेळी 31 वर्षीय करिमुल्लाने दुकानातून बाहेर येणाऱ्या तमन्नावर बूट फेकला. तमन्नाभोवती फॅन्सचा गराडा असल्यामुळे तो बूट एका कर्मचाऱ्याला लागला. नारायणगुडा पोलिसांनी करिमुल्लाला ताब्यात घेऊन त्याची चौकशी केली. गेल्या काही दिवसात तमन्नाचे चित्रपट पाहून आपली घोर निराशा झाली, तिचा अभिनय आपल्यास पसंतीस पडला नाही, म्हणून हे पाऊल उचलल्याचं त्याने सांगितले होते. बूट लागलेल्या कर्मचाऱ्याच्या तक्रारीनंतर करिमुल्लावर गुन्हा नोंदवण्यात आला आहे. करिमुल्ला मुशिराबादचा रहिवासी असून त्याचे बीटेकपर्यंत शिक्षण झाले आहे.

 

तमन्नाविषयी... 
'बाहुबली' या सिनेमात अभिनेता प्रभासच्या प्रेयसीची भूमिका साकारणारी बॉलिवूडची लोकप्रिय अभिनेत्री तमन्ना भाटियाचा जन्म 21 डिसेंबर, 1989 रोजी मुंबईत झाला. दिग्दर्शक एस.एस. राजामौली यांच्या 'बाहुबली' या एपिक सिनेमात तमन्नाने राजकुमारी अवंतिकाची भूमिका वठवली होती. 

 

तमन्ना साऊथ सिनेसृष्टीतील आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक  आहे. साऊथ इंडियन दिग्दर्शकांसोबत काम करण्यापूर्वी तमन्नाने वयाच्या अवघ्या 15 व्या वर्षी ‘चांद सा रोशन चेहरा’ या बॉलिवूड सिनेमातून अॅक्टिंग डेब्यू केले होते. 2005 मध्ये तिने 'श्री' या सिनेमातून तेलगू सिनेसृष्टीत पदार्पण केले होते. याचवर्षी तिचा ‘केडी’ हा सिनेमासुद्धा रिलीज झाला होता. एकामागून एक अनेक ब्लॉकबस्टर सिनेमे देणारी तमन्ना आता बॉलिवूड आणि साऊथ सिनेसृष्टीतील नावाजलेले नाव ठरले आहे. केवळ पडद्यावरच नव्हे तर खासगी आयुष्यातसुद्धा तमन्ना एखाद्या राजकुमारीसारखे आयुष्य जगते. तमन्नाचे घर तर अतिशय आलीशान आहे.

 

पुढील स्लाईड्समध्ये बघा, तमन्ना भाटियाच्या घराचे Inside Photos...

बातम्या आणखी आहेत...