आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एकेकाळी फरदीनच्या मागे रॅम्पवर चालली होती दीपिका, आज आहे इंडस्ट्रीची सर्वात महागडी अॅक्ट्रेस

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- अभिनेत्री दीपिका पदुकोण आता बॉलिवूडच्या आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक आहे. आज ती बॉलिवूडची लोकप्रिय आणि सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री असली, तरी एक काळ असा होता, जेव्हा ती केवळ बॅकगाऊंड मॉडेल होती. याकाळात दीपिकाला कुणी ओळखतही नव्हते. दीपिकाचा मॉडेलिंग काळातील एक फोटो समोर आला आहे, यामध्ये अभिनेता फरदीन खान शो स्टॉपर तर दीपिका त्याच्या मागे बॅकगाऊंड मॉडेल म्हणून रॅम्प वॉक करताना दिसतेय. 


दीपिका आघाडीची अभिनेत्री तर फरदीनचे संपुष्टात आले आहे करिअर...
- हा फोटो नो एंट्री या चित्रपटाच्या रिलीजनंतर झालेल्या एका इव्हेंटमधील आहे. यामध्ये दीपिका फरदीनच्या मागे रॅम्पवॉक करताना दिसतेय.
- 13 वर्षांत दीपिका बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री झाली. तर फरदीन आता लाइमलाइटमध्ये नाही. दीपिका आता एका चित्रपटासाठी 11 कोटींचे मानधन घेते. ती बॉलिवूडची सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री आहे.
- 2007 मध्ये 'ओम शांती ओम' या चित्रपटातून डेब्यू करणारी दीपिका अभिनेत्री होण्यापूर्वी मॉडेलिंग करत होती. 
- डेब्यू फिल्म रिलीज होण्यापूर्वी दीपिकाने हिमेश रेशमियाच्या 'नाम है तेरा तेरा' या म्युझिक व्हिडिओत काम केले होते. याचवेळी फराह खानने दीपिकाला पहिल्यांदा बघितले आणि तिला फिल्मची ऑफर दिली. 


पुढील स्लाईड्सवर वाचा, शिक्षण सोडून मॉडेलिंगच्या दुनियेत आली होती दीपिका... 

बातम्या आणखी आहेत...