आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Bajirao Mastani, Jodha Akbar: Super Expensive Movie Sets That Would Make Your Jaws Drop

देवदास, जोधा अकबरपासून ते पद्मावतपर्यंत, या चित्रपटांच्या सेट्सवर खर्च झाला पाण्यासारखा पैसा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

चित्रपटांना लार्जन दॅन लाईफचे स्वरुप देण्यासाठी निर्माते त्यांच्या चित्रपटांवर पाण्यासारखा पैसा खर्च करत असतात. चित्रपटांतील कलाकारांच्या मानधनापासून ते कॉश्च्युम, सेटवर कोट्यवधींचा खर्च केला जातो. अनेक निर्माते त्यांच्या चित्रपटांसाठी कोट्यवधींचा खर्च करुन सेट तयार करत असतात. ऐतिहासिक चित्रपटांना पद्यावर भव्य रुपात सादर करण्यासाठी मोठमोठ्या महालांची निर्मिती केली जाते. त्यासाठी शेकडो  कारागीर रात्रंदिवस मेहनत करुन ऐतिहासिक सेट साकारत असतात. अगदी चांदनी चौकपासून ते स्वित्झर्लंड, मुगल पॅलेसची निर्मिती चित्रपटांच्या सेटवर केली जाते.


आता हेच बघा ना, अलीकडेच रिलीज झालेल्या निर्माता-दिग्दर्शक संजय लीला भन्साळींच्या 'पद्मावत' या चित्रपटासाठी 35 कोटींचा खर्च करुन 35 भव्य सेट तयार करण्यात आले होते. तर आगामी 'केदारनाथ' या चित्रपटासाठी 7 कोटींचा खर्च करुन सेट तयार करण्यात आल्याची माहिती आहे. या चित्रपटातून सैफ अली खान आणि अमृता सिंग यांची कन्या सारा अली खान चित्रपटसृष्टीत पदार्पण करत आहे. 


'बाहुबली' चित्रपटातील महिष्मतीचा सेट उभारण्यासाठी खर्च झाले होते 35 कोटी 
एस.एस. राजामौली यांच्या गाजलेल्या 'बाहुबली' या चित्रपटातील महिष्मातीचा सेट हैदराबादच्या रामोजी फिल्म सिटीत उभारण्यात आला होता. या सेटसाठी 35 कोटींचा खर्च करण्यात आला होता. 500 कारागिरांनी 50 दिवसांत हा सेट तयार केला होता.


चित्रपटांचे सेट्स नितांत सुंदर, वास्तवाच्या जवळ जाणारे आणि महागडे असतात म्हणूनच ते प्रेक्षकांच्या मनावर वेगळी छाप सोडतात. देवदास, बाजीराव मस्तानी, बॉम्बे वेलवेट, जोधा अकबर यासह अनेक चित्रपटांमध्ये आपल्याला भव्यदिव्य सेट्सची झलक मोठ्या पडद्यावर दिसली. 


या पॅकेजमधून आम्ही तुम्हाला याच सेटची खास झलक दाखवत आहोत... 

बातम्या आणखी आहेत...