आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Bday: Salman Khans First Car Was A Second Hand Herald, Shah Rukh Drove A Maruti Omni

Salman@52 : सेकंड हॅण्ड 'हेराल्ड' होती सलमानची पहिली कार, दार तर सोडा ब्रेकही लागत नव्हता

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वरील छायाचित्रात दिसणारी हीच गाडी 'जमाना' या सिनेमात वापरली गेली होती. नंतर ही गाडी सलमानने खरेदी केली होती. ही त्याची पहिली कार होती. - Divya Marathi
वरील छायाचित्रात दिसणारी हीच गाडी 'जमाना' या सिनेमात वापरली गेली होती. नंतर ही गाडी सलमानने खरेदी केली होती. ही त्याची पहिली कार होती.

बॉलिवूड स्टार्स, बिझनेसमन आणि क्रिकेटर्ससाठी लग्झरी कार खरेदी करणे मोठी बाब नाही. कोटींची उलाढाल करणा-यांसाठी कार खरेदी करणे सामान्य आहे. मात्र एकेकाळी नावाजलेल्या सेलिब्रिटींनी सेकंड हॅण्ड किंवा छोट्या गाड्यांचा वापर केला होता. बॉलिवूडचा दबंग सलमान खानने आज वयाची 52 वर्षे पूर्ण केली आहे. सलमान बॉलिवूडचा सुपरस्टार असून त्याच्याकडे लग्झरी कारचे खूप मोठे कलेक्शन आहे. मात्र एकेकाळी त्याने सेकंड हॅण्ड हेराल्ड कार खरेदी केली होती. एका इव्हेंटमध्ये स्वतः सलमानने याचा खुलासा केला होता. या कारचा वापर 'जमाना (1985) या सिनेमात ऋषी कपूर यांनी केला होता.


सलमानचे वडील सलीम खान यांनी या सिनेमाची स्क्रिप्ट लिहिली होती. सिनेमाचे शूटिंग संपल्यानंतर सलमानने ती कार खरेदी केली होती. त्यावेळी ही कारची अतिशय दुरावस्था झाली होती. कार चालवताना अनेकदा तिला धक्का लावावा लागायचा. दार नीट बंद होत नव्हते. ब्रेकही लागत नसायचा. कार एका जागी उभी राहावी यासाठी तिच्या टायरजवळ मोठे दगड लावावे लागायचे. एवढे असूनदेखील सलमानला ही कार खूप प्रिय होती, कारण ही त्याची पहिली कार होती.


पुढील स्लाईड्समध्ये जाणून घ्या बिग बी, किंग खानसह इतर सेलिब्रिटींच्या पहिल्या कारविषयी...

बातम्या आणखी आहेत...