आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

BIGG BOSS 11 फेम अर्शी खानने बिकिनीत केले बोल्ड फोटोशूट, व्हायरल झाले PHOTOS

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबईः 'बिग बॉस सीजन-11'मध्ये आपल्या रागिट स्वभावाने चर्चेत राहिलेली अर्शी खान हिने अलीकडेच एक बोल्ड फोटोशूट केले आहे. अर्शीने बिकिनीत हे फोटोशूट केले असून त्याचे फोटोज तिने इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केले आहेत. फोटोजमध्ये अर्शी बीचवर एक्वा-ब्लू कलरच्या बिकिनीत ग्लॅमरस अंदाजात दिसतेय. हे फोटोज सोशल मीडियावर झपाट्याने व्हायरल होत आहेत. अर्शी कायम तिच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत असते. 


शाहिदच्या मुलाची आई झाल्याच्या वृत्ताला म्हटले होते गंमत...
क्रिकेटपटू शाहिद आफरीदीच्या मुलाची आई होणार असल्याचे सांगून अर्शी 2015-16 याकाळात लाइमलाइटमध्ये आली होती. पण 'बिग बॉस'च्या 'वीकेंड का वार' एपिसोडमध्ये अर्शीने ती गोष्ट केवळ एक गंमत असल्याचे उघड केले होते.

 

'बिग बॉस'मध्ये अर्शीने सपनाला म्हटले होते 'नाचने वाली...'

बिग बॉस 11 च्या एका एपिसोडमध्ये  अर्शी खान आणि सपना चौधरी यांच्यात कडाक्याचे भांडण झाले होते. एकदा तर अर्शीने सपनाला नाचनेवाली  असे म्हटले होते. त्यानंतर दोघींमध्ये बराच वाद झाला होता. नंतर सपनानेसुद्धा अर्शीवर आपला राग व्यक्त करताना तुझे थोबाड फोडेल, अस म्हटले होते. 

 

अर्शीचा सपनासोबतचा डान्स व्हिडिओ झाला व्हायरल...

एप्रिल, 2018 मध्ये अर्शी आणि सपना यांचा एक डान्स व्हिडिओ व्हायरल झाला होता. या व्हिडिओत दोघीही 'मेरे रश्के कमर' आणि अक्षय कुमारच्या 'मोहरा' चित्रपटातील 'टिप टिप बरसा पानी' या गाण्यावर थिरकताना दिसल्या होत्या.


पुढील स्लाईड्सवर बघा, अर्शीचे व्हायरल झालेले बिकिनीतील फोटोज..  

बातम्या आणखी आहेत...