आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराएन्टरटेन्मेंट डेस्कः कबीर बेदी, फिल्म इंडस्ट्रीतील असं नाव आहे, जो आपलं आयुष्य नेहमी आपल्या अंदाजात जगत आला आहे. या व्यक्तीने कधीही सामाजिक आदर्शांना महत्त्व दिले नाही किंवा व्यवहारिक नैतिकेवरही विश्वास ठेवला नाही. मॉडेलिंग क्षेत्रातून आपल्या करिअरला सुरुवात करणारे कबीर बेदी आपल्या काळातील सुंदर स्त्रियांना आकर्षित करण्यात नेहमीच यशस्वी राहिले. करिअरमध्ये ते आपल्या समवयीन अभिनेत्यांपेक्षा नेहमी वेगळे ठरले. कबीर बेदींनी केवळ बॉलिवूडमध्येच नव्हे तर परदेशातही काम करुन नाव आणि प्रसिद्धी मिळवली. भारतात परतल्यानंतर ते हिप्पी लाइफ स्टाइल आणि अनेक स्त्रियांसह असलेल्या संबंधांमुळे नेहमीच चर्चेत राहिले. चार लग्न, तीन घटस्फोट, तीन मुले आणि दोन नातवांचे आजोबा असलेले कबीर बेदी मनाने आजही तरुणच आहेत.
16 जानेवारी, 1946 रोजी लाहोर (पाकिस्तान)मध्ये जन्मलेल्या कबीर बेदींचा आज वाढदिवस असून त्यांनी वयाची 72 वर्षे पूर्ण केली आहेत. 2 वर्षांपूर्वी 70व्या वाढदिवसाच्या आदल्या दिवशी म्हणजे 15 जानेवारी 2016 रोजी त्यांनी त्यांच्यापेक्षा वयाने 29 वर्षांनी लहान गर्लफ्रेंड परवीन दोसांजसोबत लग्न केले होते. खास गोष्ट म्हणजे, त्यांची चौथी पत्नी परवीन (वय 44 वर्षे) त्यांची मुलगी पूजा बेदी (वय 48 वर्षे) पेक्षा चार वर्षांनी लहान आहे. परवीन ही ब्रिटीश वंशाची अॅक्ट्रेस आणि मॉडेल आहे. गेल्या दहा वर्षांपासून ती कबीर बेदींसोबत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये होती.
प्रोतिमा बेदी होती कबीर बेदींची पहिली पत्नी...
कबीर बेदी यांचे पहिले प्रसिद्ध अफेअर होते मॉडेल आणि नृत्यांगना प्रोतिमा बेदीसोबत. कबीर आणि प्रोतिमा यांचे विचार, जीवनशैलीसह अनेक गोष्टी सारख्या होत्या. त्यांच्या प्रेमाचे लग्नात रुपांतर झाले होते. 1969 मध्ये कबीर आणि प्रोतिमा यांनी लग्न केले होते. त्यांना पूजा आणि सिद्धार्थ ही दोन मुले झाली. मात्र या दोघांचे लग्न फार काळ टिकू शकले नाही. मात्र विभक्त झाल्यानंतरही हे दोघे चांगले मित्र होते. कबीर यांच्यापासून विभक्त झाल्यानंतर प्रोतिमा यांनी म्हटले होते, की त्यांच्या आयुष्यात आता दुस-या व्यक्तीला स्थान नाही. त्यांनी केवळ कबीरवरच प्रेम केले. याचदरम्यान त्यांचा मुलगा सिद्धार्थने आत्महत्या केली. मुलाच्या मृत्युमुळे प्रोतिमा यांना मोठा धक्का बसला होता. त्यानंतर काही दिवसांनी एका दुर्घटनेत प्रोतिमा यांचे निधन झाले. प्रोतिमा आणि कबीर यांची मुलगी पूजा बॉलिवूड अभिनेत्री आहे.
पुढील स्लाईड्सवर वाचा, कुणाकुणासोबत होते कबीर यांचे अफेअर आणि त्यांच्या आणखी तीन पत्नींविषयी...
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.