आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Birthday Kabir Bedis First Wife And Pooja Bedis Mother Protima Bedis Controversial Life

कबीर बेदीच्या पहिल्या पत्नीच्या आयुष्याला होती वादाची किनार, नग्न होऊन धावली होती बीचवर

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबईः प्रसिद्ध अभिनेते कबीर बेदी यांचा आज (16 जानेवारी) वाढदिवस असून त्यांनी वयाची 72 वर्षे पूर्ण केली आहेत. दोन वर्षांपूर्वी म्हणजेच वयाच्या सत्तरीत त्यांनी चौथे लग्न थाटले. त्यांचे पहिले लग्न 1969 मध्ये मॉडेल आणि नृत्यांगणा प्रोतिमा बेदी यांच्यासोबत झाले होते. कबीर बेदी यांच्याप्रमाणेच प्रोतिमा यांच्याही खासगी आयुष्याला वादाची किनार होती. हे दोघेही लग्नापूर्वी लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहिले होते. अभिनेत्री पूजा बेदी ही कबीर आणि प्रोतिमा यांचीच मुलगी आहे. कसे होते प्रोतिमा यांचे खासगी आयुष्य, त्यावर टाकुयात एक नजर...

 

 

लग्नाआधीच प्रेग्नेंट राहिल्या होत्या प्रोतिमा बेदी.. 

 

वयाच्या 19 व्या वर्षापासून कबीर बेदी यांच्याबरोबर लीव इन मध्ये राहणाऱ्या प्रोतिमा या

लग्नाअगोदरच प्रेग्नेंच झाल्या होत्या. त्यानंतर प्रोतिमा आणि कबीर यांनी विवाह केला होता.

 

मासिकासाठी बीचवर केले होते नग्न फोटोशूट..
- एका मासिकाच्या फोटोशूटसाठी प्रोतिमा नग्न बीचवर धावल्या होत्या. विशेष म्हणजे तेव्हा पूजा बेदी 4 वर्षांची होती. 

- प्रोतिमा 'सिनेब्लिट्ज' या मासिकासाठी नग्न होऊन बीचवर धावल्या होत्या.

- 1974 साली हे मासिक लाँच होणार होते. तेव्हा मासिकाच्या प्रमोशनसाछी मासिकाचे चीफ करंजिया यांनी असे करण्यास प्रोतिमाला सांगितले होते. 
- त्यांनी त्यांच्या टीमला सांगितले की, अशा एका अभिनेत्री अथवा मॉडेलला शोधा जी संपूर्ण विवस्त्र होऊन बीचवर पळू शकेल आणि ती छायाचित्रे 'सिनेब्लिट्ज' मासिकात छापता येतील.
- मासिकाला हिट करण्यासाठी अशी युक्ती त्यांनी लढविली होती. 
- पण टीमपुढे सर्वात मोठा प्रश्न असा होता, की असे करायला तयार कोण होईल. कारण त्याकाळी असे करण्याचे धाडस करणारी मॉडेल अथवा अभिनेत्री शोधणे फारच कठीण काम होते. 
- 'सिनेब्लिट्ज' मासिकाच्या एडिटर रुसी यांनी प्रोतिमा यांचे नाव पुढे केले. प्रोतिमा यांना याबद्दल विचारले असता त्यांनी ते मान्य केले.


पुढील स्लाईडवर वाचा, प्रोतिमा यांच्या जीवनाविषयी काही खास गोष्टी..

बातम्या आणखी आहेत...