आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Birthday Spl : या अपार्टमेंटमध्ये राहतो हृतिक रोशन, पाहा लॅव्हिश घराचे 18 INSIDE PHOTOS

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हृतिक रोशनच्या लॅव्हिश घरातील लिव्हिंग एरिया - Divya Marathi
हृतिक रोशनच्या लॅव्हिश घरातील लिव्हिंग एरिया

बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता हृतिक रोशनचा आज वाढदिवस असून त्याने वयाची 44 वर्षे पूर्ण केली आहेत.  10 जानेवारी 1974 रोजी प्रसिद्ध दिग्दर्शक आणि अभिनेते राकेश रोशन यांच्या घरी हृतिकचा जन्म झाला. 14 जानेवारी 2000 रोजी 'कहो ना प्यार है' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये यशस्वी पदार्पण करणारा हृतिक आता त्याच्या आगामी 'कृष 4' या चित्रपटाच्या तयारीला लागला आहे. हृतिक त्याच्या लॅव्हिश लाइफस्टाइलसाठी ओळखला जातो.  काही महिन्यांपूर्वीच हृतिकने जुहूमध्ये सी-फेसिंग अपार्टमेंट खरेदी केले. 

 

कतरिनाचे घर पाहून हृतिकने फायनल केले आर्किटेक्ट...
हृतिकचे लॅव्हिश अपार्टमेंट जुहू स्थित प्राइम बीच बिल्डिंगच्या तिस-या मजल्यावर आहे. एका पोर्टलला दिलेल्या मुलाखतीत घराचा आर्किटेक्ट आशिष शाहने सांगितले, की कतरिना कैफच्या घराचे डिझाइन्स आवडल्यानंतर हृतिकने त्याला कॉन्ट्रॅक्ट दिले होते. हृतिकची इच्छा होती, की हे घर त्याची मुले रिहान आणि रिदानच्या इच्छेनुसार तयार केले जावे. घरातील फर्निचरचे शॉपिंग दुबई आणि हृतिकच्या मेव्हणीच्या स्टोरमधून करण्यात आले आहे. याशिवाय वेगवेगळ्या देशांत व्हॅकेशनवर गेलेल्या हृतिकने आपल्या पसंतीने सामान खरेदी केले आहेत. घरातील भिंतींवर कोटेशन्स लावले आहेत, त्यातील काही हृतिकने लिहिले आहेत.


अक्षय कुमारचा शेजारी आहे हृतिक...
अक्षय कुमार आणि हृतिक रोशन शेजारी-शेजारी आहेत. जुहू स्थित सी-फेसिंग प्राइम बीच बिल्डिंगमध्ये दोघांचा आशियाना आहे. अक्षय या इमारतीत मागील अनेक वर्षांपासून राहत आहे. या इमारतीतील चार फ्लॅट अक्षयचे आहेत. तसेच हृतिक मागील वर्षीच तिस-या मजल्यावर शिफ्ट झाला आहे. दोघांनी कधीच कोणता सिनेमात एकत्र काम केले नाही. परंतु दोघांमध्ये खूप चांगले नाते आहे. निर्माता साजिद नाडियाडवालासुद्धा याच इमारतीत राहतो.


पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा, हृतिक रोशनच्या या लॅव्हिश घराची खास झलक...

बातम्या आणखी आहेत...