आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Birthday Special Actress Moushumi Chatterjee Unknown Facts मौसमी चॅटर्जी

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

B'day : मौसमी यांनी प्रेग्नेंसीत शूट केला होता रेप सीन, हेमंत कुमार यांच्या आहेत सूनबाई

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मौसमी चॅटर्जी - Divya Marathi
मौसमी चॅटर्जी


मुंबई - गतकाळातील प्रसिद्ध अभिनेत्री मौसमी चॅटर्जी यांचा आज वाढदिवस असून त्यांनी वयाची 65 वर्षे पूर्ण केली आहेत. 26 एप्रिल 1953 रोजी कोलकाता येथे त्यांचा जन्म झाला. 1967 मध्ये बंगाली दिग्दर्शक तरुण मजुमदार यांच्या 'बालिका वधू' या सिनेमाद्वारे त्यांनी आपल्या फिल्मी करिअरला सुरुवात केली होती. त्यानंतर 1972 मध्ये रिलीज झालेल्या 'अनुराग' या सिनेमाद्वारे त्यांनी बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवले होते. 'कच्चे धागे', 'जहरीला इंसान', 'स्वर्ग नरक', 'फूलखिले हैं गुलशन गुलशन', 'मांग भरो सजना', 'दासी', 'अंगूर', 'घर एक मंदिर', 'जल्लाद' हे त्यांचे काही निवडक गाजलेले सिनेमे आहेत.

 

मौसमी नव्हे हे आहे खरे नाव
वयाच्या 14 व्या वर्षी अभिनय क्षेत्रात पदार्पण करणा-या मौसमी यांचे खरे नाव इंदिरा असे आहे. मात्र इंदिरा या नावापेक्षा मौसमी या नावाने त्यांना यश मिळेल असे प्रसिद्ध बंगाली दिग्दर्शक तरुण मजूमदार यांचे मत होते. त्यामुळे इंदिरा यांनी मौसमी या नावाने सिनेसृष्टीत पदार्पण केले.

 

विनोद मेहरांसोबत गाजली पडद्यावरची जोडी... 
मौसमी आणि विनोद मेहरा यांच्या जोडीला प्रेक्षकांनी विशेष पसंत केले. याशिवाय जितेंद्र, संजीव कुमार, राजेश खन्ना, शशी कपूर आणि अमिताभ बच्चन यांच्यासोबतही मौसमी यांनी काम केले. मौसमी यांनी प्रसिद्ध गायक हेमंत कुमार यांचा मुलगा जयंत यांच्यासोबत लग्न केले आहे. मौसमी आपल्या कुटुंबीयांसोबत कोलकातामध्ये राहतात.

 

ग्लिसरीन न वापरता करतात रडण्याचे सीन... 
मौसमी चॅटर्जी यांच्याविषयी म्हटले जाते की, रडण्याचे दृश्य त्या अगदी सहज करतात. यासाठी त्यांना ग्लिसरीनची आवश्यकता भासत नाही. याविषयी त्यांना विचारले असता, त्या हसून म्हणतात ''होय हे खरं आहे. हे देवाने दिलेले एक वरदान आहे. जेव्हाही मी रडण्याचे दृश्य करायची, तेव्हा ती घटना आपल्यासोबत प्रत्यक्षात घडतंय असं वाटायचं, त्यामुळे आपोआप डोळ्यात अश्रू तरळायचे.''


मौसमी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत जाणून घेऊयात, त्यांच्या खासगी आयुष्याविषयी बरंच काही.. पुढील स्लाईडवर वाचा, प्रेग्नेंट असताना शूट केला होता बलात्काराचा सीन..  

बातम्या आणखी आहेत...