आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

400 कोटींच्या संपत्तीचे मालक आहेत अनुपम खेर, लोनवर खरेदी केली 42 लाखांची BMW

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई: अनुपम खेर यांचा आज वाढदिवस असून त्यांनी वयाची 63 वर्षे पूर्ण केली आहेत. 7 मार्च 1955 रोजी शिमला येथे त्यांचा जन्म झाला. अनुपम यांनी 1984 मध्ये रिलीज झालेल्या  'सारांश' या चित्रपटातून सिनेसृष्टीत पदार्पण केले होते. आतापर्यंत त्यांनी 500 हून अधिक चित्रपटांमध्ये भूमिका वठवल्या आहेत. अभिनय क्षेत्रातील योगदानासाठी त्यांना 2004 मध्ये पद्मश्री आणि 2006 मध्ये पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. अभिनयासाठी त्यांनी बॅक टू बॅक 8 वेळा फिल्मफेअर पुरस्कारावर आपले नाव कोरले. अनुपम खेर यांच्या संपत्तीविषयी सांगायचे झाल्यास, त्यांच्याकडे मुंबईतील जुहू आणि अंधेरी भागात दोन बंगले आहेत. आलिशान कारची त्यांना आवड आहे. त्यांच्या कलेक्शनमध्ये BMW आणि Scorpio या गाड्या आहेत. इंटरनेटवर उपलब्ध असलेल्या माहितीनुसार, त्यांची नेटवर्थ 70 मिलियन डॉलर अर्थातच 400 कोटी इतकी आहे.


लोनवर खरेदी केली होती 42 लाखांची BMW
- अनुपम खेर यांच्या पत्नी आणि बॉलिवूड अभिनेत्री किरण खेर या 2014 मध्ये भाजप पक्षाकडून निवडणूक जिंकल्या होत्या. त्या चंदीगडच्या खासदार म्हणून निवडून आल्या होत्या. त्यांनी सादर केलेल्या एफिडेविटमध्ये 33.5 कोटींची संपत्ती जाहीर केली होती.
- एफिडेविटनुसार अनुपम यांच्याजवळ 42.6 लाखांची BMW कार आहे. ही गाडी त्यांनी इंडिया फायनॅन्शिअल सर्व्हिसेस प्रायवेट लिमिटेडकडून 17.64 लाखांचे लोन घेतले होते. याशिवाय त्यांनी 20-20 टेलिव्हिजन कंपनीकडून 1.21 लाखांचे बिझनेस लोन घेतले आहे. 

 

क्लर्क होते अनुपम यांचे वडील
- अनुपम खेर यांचे वडील पुष्कर नाथ खेर हिमाचल प्रदेशातील फॉरेस्ट डिपार्टमेंटमध्ये क्लर्क होते. मार्च 2017 मध्ये अनुपम यांनी शिमल्यात एक बंगला खरेदी करुन तो त्यांच्या मातोश्री दुलारी खेर यांना भेट म्हणून दिला होता.
- आईला बंगला गिफ्ट करुन अनुपम यांनी ट्विटरवर लिहिले होते, "शिमल्यात आमचे सगळे आयुष्य सरकारी क्वॉर्टर आणि भाड्याच्या घरात गेले. काही कारणास्तव एवढ्या वर्षांत मी या शहरात प्रॉपर्टी खरेदी करु शकलो नव्हतो. पण आता हे मला शक्य झाले आहे."
- अनुपम यांचे शालेय शिक्षण शिमल्यातील डीएवी स्कूलमध्ये झाले. हिमाचल प्रदेश युनिव्हर्सिटीत ग्रॅज्युएशन करत असताना त्यांनी नाटकांमध्ये काम केले होते.


पुढील स्लाईड्सवर वाचा, अनुपम खेर यांच्या आयुष्याशी निगडीत आणखी काही खास गोष्टी... 

बातम्या आणखी आहेत...