आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Birthday Special Bollywood Actor Manoj Bajpayees Journey From Bihar To Bollywood

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

B'day: ...म्हणून आत्महत्या करणार होता मनोज बाजपेयी, 300 रुपयांत करायचा उदरनिर्वाह

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आज (23 एप्रिल) वयाची 49 वर्षे पूर्ण करणारा अभिनेता मनोज बाजपेयी एका सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातून असल्याचे फार कमी जणांना ठाऊक आहे. बिहारच्या गल्लीबोळातून बाहेर पडून तो बॉलिवूडचा यशस्वी अभिनेता ठरला आहे. एकेकाळी मनोजला केवळ 300 रुपयांत उदरनिर्वाह करावा लागत असे.

 

आज मनोजच्या वाढदिवसाचे औचित्य साधत बिहारचा एक सर्वसामान्य तरुण बॉलिवूडचा यशस्वी अभिनेता कसा बनला जाणून घेऊयात...

 

मनोज त्या गावातील तरुण आहे, जिथे आजही अभिनय करणे चांगले समजेल जात नाही...

- मनोजचे घर बिहारमधील बेलवा गावांत आहे. या ठिकाणी आजही अभिनेता असणे चांगले समजले जात नाही. 
- जेव्हा मनोजने आपल्या कुटुंबीयांकडे अभिनेता बनण्याची इच्छा व्यक्त केली तेव्हा, कुटुंबीयच नव्हे तर शेजारी, नातेवाईकांनी त्याची खिल्ली उडवली होती. 
- मनोजचे चौथीपर्यंतचे शिक्षण गावात झाले. त्यानंतर बिहारच्या बेतिया या ठिकाणी त्याला पुढील शिक्षणासाठी पाठवण्यात आले. 
- येथील केआर हायस्कूलमध्ये त्याने दहावीपर्यंतचे शिक्षण घेतले. 
- बेतिया येथील महाराणी जानकी कॉलेजमधून त्याने बारावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. 
- पुढील शिक्षणासाठी मनोज वयाच्या 17 व्या वर्षी दिल्लीत आला. दिल्ली युनिव्हर्सिटीच्या सत्यवती आणि रामजस कॉलेजमधून त्याने पदवीपर्यंतचे शिक्षण घेतले.

 

पुढे वाचा - अभिनयातच करिअर करण्याचा घेतला निर्णय

- का केला होता आत्महत्येचा विचार? यांसह बरेच काही... 

बातम्या आणखी आहेत...