Home »Gossip» Birthday Special : Hritik Roshan Unseen And Rare Pics

B'day:आज 44 वर्षाचा झाला हृतिक रोशन, पाहा लहानपणापासूनचे आतापर्यंत काही Rare Photos

दिव्य मराठी वेब टीम | Jan 10, 2018, 18:36 PM IST

मुंबई - हृतिक रोशनने आज वयाची 44 वर्षे पूर्ण केली आहेत. 10 जानेवारी 1974 साली जन्मलेल्या हृतिकने चाईल्ड अॅक्टर म्हणून करिअरची सुरुवात केली होती. बुधवारी मुंबई येथील घरी हृतिकने त्याचा वाढदिवस सेलिब्रेट केला. यावेळी सकाळपासूनच हृतिकच्या घरी फॅन्सची गर्दी जमली होती. हृतिकने फिल्म इंडस्ट्रीत वडील राकेश रोशनसोबत असिस्टंट डायरेक्टर म्हणून सुरुवात केली होती. 'कहो ना प्यार है'नंतर सुरु झाले करिअर..

आज हृतिकची ओळख एक उत्तम डान्सर अशी आहे. पण वयाच्या 21व्या वर्षापर्यंत त्याला डान्स करायला फार प्रॉब्लेम येत असे. तेव्हा त्याने हाडांचे एक ऑपरेशन केले आणि तेव्हापासून तो डान्सचा सुपरस्टार बनला.

आलिशान बंगल्यात राहणाऱ्या हृतिक रोशन वडिलांच्या खूप जवळ आहे. जेव्हा राकेश रोशन एका सेटवर असायचे तेव्हा सगळे लहानमोठे काम तेच करत असत. यात फरसीची सफाई आणि सर्वांना चहा देण्याचे काम तोच करत असत.

पुढच्या स्लाईडवर पाहा, हृतिक रोशनचे लहानपणापासून आतापर्यंतेच काही खास PHOTOS...

Next Article

Recommended