आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बालपणी असा दिसायचा मिका सिंह, असा होता इंडस्ट्रीतला स्ट्रगल

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एन्टटेन्मेंड डेस्क : प्रसिध्द बॉलिवूड सिंगर मिका सिंह आज 41 वा वाढदिवस साजरा करतोय. 10 जून 1977 रोजी पश्चिम बंगालच्या दुर्गापूर येथे जन्मलेल्या मिकाचे खरे नाव अमरीक सिंह आहे. मात्र बॉलिवूडमध्ये मिका या नावाने तो प्रसिद्ध आहे. मिका प्रसिद्ध गायक दलेर मेंहदीचा धाकटा भाऊ आहे.


आपल्या भावाच्या पावलावर पाऊल ठेवत मिकाने इंडस्ट्रीत गायक म्हणून स्वतःची वेगळी ओळख नर्माण केली. बॉलिवूडमध्ये आज कॉन्ट्रोव्हर्सी किंग मिका सिंगला मोठी मागणी आहे. एका काळ असा होता, जेव्हा लोक त्याचे तोंड बघणेही पसंत करत नव्हते. मात्र मिकाने आपल्या आवाजाच्या बळावर स्वतःची ही इमेज पुसून काढली.


एकेकाळी इंडस्ट्रीत करावा लागला होता स्ट्रगल
मिका सिंग आपल्या भावाच्या बँडमध्ये गिटारिस्ट म्हणून काम सुरु केले होते. मिकाने दलेर यांच्यासाठी 'डर दी रब रब कर दी' हे गाणे कंपोज केले होते. त्यानंतर त्याने स्वतः पार्श्वगायन करण्याचा निर्णय घेतला. मात्र जेव्हा मिका रेकॉर्डिंग स्टुडिओत जायचा तेव्हा दलेर मेंहदीच्या नावावर संगीतकार, दिग्दर्शक त्याचे गाणे ऐकायला तयार तर व्हायचे, मात्र दुस-याच क्षणी त्याचा अन-कन्वेंशनल आवाज ऐकून त्याला रिजेक्ट करायचेय मिकाला अनेकदा नकाराचा सामना करावा लागला. प्रत्येक ठिकाणी निराश झाल्यानंतर मिकाने स्वतःचा अल्बम काढण्याचा निर्मय़ घेतला. अल्बममधील 'सावन में लग गई आग' हे गाणे प्रेक्षकांच्या मनावर राज्य करतंय. त्यानंतर मिकाने आपल्या याच अन-कन्वेंशनल आवाजाच्या बळावर स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली.


पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा मिका सिंहचे बालपणीचे फोटोज...

 

(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...