आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

B\'day Spl: मराठमोळी नम्रता आहे दाक्षिणात्य कुटुंबातील सून, तीन वर्षांनी लहान आहे पती

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


बॉलिवूड अभिनेत्री नम्रता शिरोडकर हिचा आज वाढदिवस असून तिने वयाची 46 वर्षे पूर्ण केली आहेत. 22 जानेवारी 1972 रोजी एका मराठी कुटुंबात नम्रताचा जन्म झाला. तिची थोरली बहीण शिल्पा शिरोडकर ही देखील बॉलिवूड अभिनेत्री राहिली आहे. 1993 साली मिस इंडियाचा ताज जिंकून नम्रता पहिल्यांदा प्रसिद्धीझोतात आली होती. मिस युनिव्हर्स सौंदर्य स्पर्धत ती पाचव्या स्थानावर होती. ब्युटी कॉन्टेस्ट जिंकल्यानंतर काही वर्षे मॉडेलिंग करुन नम्रता सिनेसृष्टीकडे वळली होती. मात्र आता नम्रता लाइमलाइटपासून दूर असून वैवाहिक आयुष्य जगत आहे. नम्रता दोन मुलांची आई आहे. 


मराठमोळ्या नम्रताने केले साऊथ सुपरस्टारसोबत लग्न...
नम्रताचे लग्न दाक्षिणात्य फिल्म इंडस्ट्रीचा सुपरस्टार महेश बाबूसोबत झाले आहे. विशेष म्हणजे या दोघांच्या वयात तीन वर्षांचे अंतर आहे. नम्रता महेश बाबूपेक्षा वयाने मोठी आहे. 9 ऑगस्ट 1975 रोजी चेन्नईत महेश बाबूचा जन्म झाला. या दोघांच्या लग्नाला 13 वर्षांचा काळ लोटला आहे. 


अशी सुरु झाली लव्हस्टोरी...  
2005 साली नम्रता आणि महेश बाबू विवाहबद्ध झाले. दोघांची पहिली भेट 2000 साली 'वामसी' या चित्रपटाच्या सेटवर झाली होती. येथून त्यांच्या प्रेमकहाणीला सुरुवात झाली. पाच वर्षांच्या डेटिंगनंतर दोघांनी लग्न केले. दाक्षिणात्य पद्धतीने दोघांचे लग्न झाले होते. या दाम्पत्याला गौतम कृष्णा हा एक मुलगा आणि सितारा ही एक मुलगी आहे. 


आज नम्रताच्या वाढदिवसाचे औचित्य साधत बघुयात, तिच्या लग्नाचा अल्बम...

बातम्या आणखी आहेत...