आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इराणमध्ये लहानाची मोठी झाली नसीरुद्दीन शाह यांची मुलगी, 'दादी-सा'सोबत आहे हे खास नाते

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबईः  20 जुलै 1949 रोजी बाराबंकी, उत्तर प्रदेशात जन्मलेले नसीरुद्दीन शाह यांनी वयाची 69 वर्षे पूर्ण केली आहेत. नसीर यांनी अलीगड मुस्लिम यूनिव्हर्सिटी येथून कला शाखेत ग्रॅज्युएशन पूर्ण केले. त्यानंतर 1971 साली त्यांनी नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामध्ये अभिनयाचे धडे गिरवले. नसीरुद्दीन शाह यांच्या पहिल्या लग्नाविषयी फारसे कुणाला ठाऊक नाही. त्यांचे पहिले लग्न मनारा सिकरी उर्फ परवीनसोबत झाले होते. दोघांचे हा प्रेमविवाह होता. मनारा या पाकिस्तानी वंशाच्या होत्या. पहिल्या लग्नापासून नसीर यांना एक मुलगी असून हीबा हे तिचे नाव आहे. 


इराणमध्ये लहानाची मोठी झाली हीबा....
- नसीर आणि मनारा यांचे 1969 साली लग्न झाले होते. लग्नाच्या वेळी नसीर 20 तर परवीन 35 वर्षांच्या होत्या. दोघांच्या वयात तब्बल 15 वर्षांचे अंतर होते.
- लग्नाच्या वर्षाच्या आतच त्यांच्या मुलीचा जन्म झाला. मुलीच्या जन्मानंतर नसीर आणि मनारा विभक्त झाले.
- नसीर यांच्यापासून विभक्त झाल्यानंतर मनारा मुलगी हीबाला घेऊन लंडनला निघून गेल्या. काही काळ लंडनमध्ये घालवल्यानंतर त्या इराणला गेल्या. इराणमध्येच नसीर यांची कन्या वाढली.

- पण आईच्या निधनानंतर हीबा नसीर यांच्याकडे भारतात परतली.
- जेव्हा हीबा भारतात परतली, तेव्हा नसीर यांचे रत्ना पाठक यांच्यासोबत दुसरे लग्न झाले होते. त्यांच्या लग्नाच्यावेळी हीबा ही 14 वर्षांची होती.  रत्ना यांनी एकदा सांगितले होते, की  हिबा माझा स्वीकार करेल की नाही यांची थोडी चिंता वाटली. पण रत्ना आणि हिबा यांच्यात आई आणि मुलीचे नाते निर्माण झाले. रत्ना यांना ईमाद आणि वीवान ही दोन मुले आहेत. ईमाद 'यू होता तो क्या होता' आणि वीवान दिग्दर्शक विशाल भारव्दाजच्या 'सात खून माफ' आणि फराह खानच्या 'हॅपी न्यू इयर'मध्ये झळकला आहे.


'बालिका वधू' फेम दादीसा अर्थातच सुरेखा सीकरींसोबत आहे खास नाते...
- टीव्हीवरील गाजलेल्या 'बालिका वधू' या मालिकेत दादीसाची भूमिका वठवलेल्या सुरेखा सीकरी यांची हिबा नातलग आहे.
- हीबाची आई मनारा आणि सुरेखा या दोघी बहिणी होत्या.
- या नात्याने सुरेखा या हीबाच्या मावशी आहेत.  'बालिका वधू'(2008) या मालिकेत हीबाने दादासीच्या तारुण्याची भूमिका वठवली होती.
- हीबा एक थिएटर आर्टिस्ट असून तिने 2002 मध्ये 'मैंगो शफल'द्वारे रंगभूमीवर पदार्पण केले होते. याशिवाय ती 'हाथी का अंडा'(2002), 'मिस्ड कॉल'(2005), क्यू(2014), 'पूर्णा: करेज हैज नो लिमिट'(2017) सह अनेक शॉर्ट फिल्म्समध्ये झळकली आहे.


पुढील स्लाईड्सवर बघा, नसीरुद्दीन शाह यांची कन्या हीबाचे 7 PHOTOS... 

बातम्या आणखी आहेत...