आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

B'Day: ही अभिनेत्री आहे परेश रावल यांची आयुष्याची जोडीदार, एकेकाळी होती मिस इंडिया

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबईः बॉलिवूडमध्ये बाबू भैय्या या नावाने प्रसिद्ध असलेले अभिनेते आणि राजकारणी परेश रावल यांनी आज वयाची 68 वर्षे पूर्ण केली आहेत. 30 मे 1950 रोजी मुंबईत त्यांचा जन्म झाला. मुंबईतील विले पार्लेस्थित नरसी मोंजी कॉलेज ऑफ कॉमर्स अँड इकोनॉमिक्स येथून त्यांनी आपले शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर 1984 मध्ये होली या सिनेमाद्वारे त्यांनी बी टाऊनमध्ये पदार्पण केले. पदार्पणानंतर दोन वर्षांनी त्यांना पहिल्यांदा यशाची चव चाखायला मिळाली. 'नाम' हा त्यांचा पहिला हिट ठरलेला सिनेमा आहे. त्यांनी आपल्या करिअरमध्ये आत्तापर्यंत 200 हून अधिक सिनेमांमध्ये अभिनय केला आहे. धरम संकट में हा त्यांचा अलीकडेच रिलीज झालेला सिनेमा आहे. 


मिस इंडियासोबत लग्न 
परेश रावल यांच्या पत्नीचे नाव स्वरुप संपत आहे. फार कमी लोकांना हे ठाऊक आहे, की स्वरुप या माजी मिस इंडिया आहेत. 1979 मध्ये त्या मिस इंडिया या सौंदर्य स्पर्धेत सहभागी झाल्या होत्या. त्याचवर्षी त्या या किताबाच्या मानकरी ठरल्या. त्यानंतर मिस युनिव्हर्स स्पर्धत त्यांनी भारताचे प्रतिनिधित्वही केले होते. स्वरुप यांनी छोट्या पडद्यावर आपल्या अभिनयाची छाप सोडली आहे. 'ये जो है जिंदगी' या गाजलेल्या मालिकेत त्या महत्त्वपूर्ण भूमिकेत झळकल्या होत्या. या शोसाठी त्यांनी अनेक मालिकांच्या ऑफर नाकारल्या होत्या. 


सिल्व्हर स्क्रिनवर केले आहे पत्नीने काम...  
स्वरुप यांनी अनेक बॉलिवूड सिनेमांमध्येही काम केले आहे. यामध्ये 'नरम गरम' (1981), 'हिम्मतवाला' (1983), 'करिश्मा' (1984) आणि 'साथिया' (2002) हे त्यांचे प्रमुख सिनेमे आहेत. 1984 मध्ये रिलीज झालेल्या कमल हासन-रिना रॉय स्टारर 'करिश्मा' या सिनेमात जेव्हा त्या बिकिनी परिधान करुन अवतरल्या होत्या, तेव्हा त्यांची परफेक्ट फिगर बघून सर्वजण आश्चर्यचकित झाले होते. 


दोन मुलांचे पालक आहे परेश-स्वरुप
परेश रावल आणि स्वरुप या दाम्पत्याला दोन मुले आहेत. आदित्य आणि अनिरुद्ध ही त्यांच्या मुलांची नावे आहेत. 

 

पुढील स्लाईड्सवर बघा, स्वरुप संपत आणि परेश रावल यांची निवडक छायाचित्रे...

बातम्या आणखी आहेत...