आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Birthday special: या 5 कारणांमुळे पूनम पांडे झाली फेमस

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूडमध्ये काही अनेक अभिनेत्री आहेत, ज्या नेहमी स्वतःला वादांपासून दूर ठेवतात. मात्र काही जणी अशादेखील आहेत, ज्यांना वादांमुळेच बॉलिवूडमध्ये एन्ट्री मिळाली. अशाच वादग्रस्त अभिनेत्रींपैकी एक अभिनेत्री म्हणजे पूनम पांडे. मॉडेलिंग जगतापासून ते बॉलिवूडपर्यंत सर्वच तिला ओळखतात. 'कॉन्ट्रोव्हर्सी क्वीन' म्हणूनही तिची ओळख आहे. या वादग्रस्त अभिनेत्रीचा आज वाढदिवस असून तिने आपल्या वयाची 27 वर्षे पूर्ण केली आहे. 11 मार्च 1991 रोजी दिल्लीत पूनमचा जन्म झाला. 

 

पूनमने मॉडेलिंग क्षेत्रातून आपल्या करिअरची सुरुवात केली. ग्लॅडरॅग्स 2010च्या टॉप 8 स्पर्धकांपैकी ती एक होती. 2011मध्ये तिने एक दोन नव्हे तर तब्बल 29 कॅलेंडर्साठी फोटोशूट केले होते. याशिवाय याचवर्षी तिने किंगफिशर कॅलेंडरवरही आपल्या दिलखेचक अदा दाखवल्या होत्या. 

 

लाइमलाइटमध्ये कसे राहावे, हे पूनमला चांगलेच ठाऊक आहे. सोशल नेटवर्किंग साईट्सवर आपली उत्तेजक छायाचित्रे पोस्ट करुन पूनम केवळ लाइमलाइटमध्येच राहिली नाही तर अनेकदा वादातसुद्धा अडकली आहे. टीम इंडियाला शुभेच्छा देण्यासाठी तिने स्वतःची बोल्ड छायाचित्रे आपल्या ट्विटर अकाउंटवर शेअर केली होती.


 पूनम पांडेला प्रसिद्धी मिळवून देणा-या पाच वादांविषयी आम्ही तुम्हाला सांगत आहोत. 

बातम्या आणखी आहेत...