आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Birthday Special: Real Life Photos Of Ambitabh Bachchan Younger Brother Ajitabh Bachchan

B'day : 71 वर्षांचे झाले अमिताभचे धाकटे भाऊ, पाहा Real Life चे Photos

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अजिताभ आणि रमोला यांच्या लग्नात डावीकडून हरिवंश राय बच्चन, अमिताभ, जया आणि तेजी बच्चन - Divya Marathi
अजिताभ आणि रमोला यांच्या लग्नात डावीकडून हरिवंश राय बच्चन, अमिताभ, जया आणि तेजी बच्चन


मुंबईः अमिताभ बच्चन यांचे धाकटे बंधू अजिताभ बच्चन यांचा आज वाढदिवस असून त्यांनी वयाची 71 वर्षे पूर्ण केली आहेत. 18 मे 1947 रोजी इलाहाबाद येथे हरिवंशराय बच्चन आणि तेजी बच्चन यांच्या घरी अजिताभ यांचा जन्म झाला. अजिताभ आणि अमिताभ यांच्या वयात पाच वर्षांचे अंतर आहे. अमिताभ यांच्याप्रमाणेच अजिताभ यांनीही नैनीतालच्या शेरवूड कॉलेजमधून शिक्षण पूर्ण केले. बिझनेसमन अजिताभ पंधरा वर्षे लंडनमध्ये वास्तव्याला होते.

 

आईच्या निधनानंतर परतले भारतात...
2007 मध्ये आई तेजी बच्चन यांच्या निधनानंतर अजिताभ आपल्या कुटुंबासोबत भारतात परतले. अजिताभ यांच्या पत्नीचे नाव रमोला असून त्या बिझनेसवुमन आणि सोशलाइट आहेत.

 

4 मुलांचे वडील आहेत अजिताभ...
अजिताभ आणि रमोला यांना एकुण चार अपत्ये आहेत. मुलाचे नाव भीम तर मुलींची नावे नीलिमा, नम्रता आणि नैना आहे. नैनाचे अभिनेता कुणाल कपूरसोबत लग्न झाले आहे. भीम हा व्यवसायाने बँकर असून न्यूयॉर्कमध्ये राहायचा. काही दिवसांपूर्वीच तोदेखील भारतात शिफ्ट झाला आहे. अजिताभ यांची मुलगी नीलिमा ही आर्टिस्ट असून मुंबई आणि दिल्लीत तिच्या पेटिंग्सचे एक्झिबिशन लागत असते. अजिताभ नेहमीच लाइमलाइटपासून दूर राहतात. क्वचितच ते एखाद्या इव्हेंटमध्ये दिसतात. 


पुढील स्लाईड्समध्ये पाहा, अजिताभ बच्चन यांची खास छायाचित्रे...   

बातम्या आणखी आहेत...